Pune News : पुण्यातील कसबा(Kasaba) आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याठिकाणी राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पोटनिवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारां(Ajit Pawar)नी चिंचवड पोटनिवडणुकीत स्वत: लक्ष घातलेलं आहे. मात्र, याचदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरात चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. ही चोरीची घटना गुरुवारी (दि.९) मध्यरात्री झाली. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांचे संबंधित नातेवाईक औंध परिसरात राहतात. त्यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री चोरी करण्यात आली. चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पवारांच्या नातेवाईकांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी पिस्तुलासह काही रोख रक्कम पळविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस पुढील तपास सुरु केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.