Pune Crime : राजगुरूनगरमधील 2 बहि‍णींची शेजारी राहणाऱ्या आचाऱ्यानेच केली हत्या, संतापजनक कारण आलं समोर

Pune Rajgurunagar girls murder case : राजगुरूनगरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या दोन बहिणी अचानक गायब झाल्याची घटना समोर आली होता. त्यानंतर रात्री या दोन्ही बहि‍णींचे मृतदेह आढळून आले. तर या मुलींची हत्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या आचाऱ्यानेच केल्याची संतापजनक माहिती उघडकीस आली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 26 Dec : पुण्यातील (Pune) राजगुरूनगरमध्ये दोन बहिणींची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या मुलींची हत्या नेकमी कशामुळे झाली याचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बुधवारी (ता.25) राजगुरूनगरमध्ये (Rajgurunagar) घराबाहेर खेळत असलेल्या दोन बहिणी अचानक गायब झाल्याची घटना समोर आली होता. त्यानंतर रात्री या दोन्ही बहि‍णींचे मृतदेह आढळून आले. तर या मुलींची हत्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या आचाऱ्यानेच केल्याची संतापजनक माहिती उघडकीस आली आहे.

शिवाय या नराधमाने या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचंही पोलिस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगरमधील दोन बहि‍णींची हत्या त्यांच्याच घराच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एका आचाऱ्याने केली. या नराधमाने या मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime News
Pune Crime News : 2 चिमुकल्या बहि‍णींच्या हत्येने पुणे हादरलं, घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाल्या अन्...

मात्र, यावेळी मुलींनी आरडाओरडा करायला सुरूवात केली. त्यावेळी आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने दोघींची हत्या केली. दुर्वा (8) आणि कार्तिकी मकवाने (9) अशी हत्या झालेल्या बहिणींची नावं आहेत. आचाऱ्याने या दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात नेलं आणि त्याने सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime News
Santosh Deshmukh Murder Case : 'वाल्मिक कराड यांनी सरेंडर करावं अन् धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा..'; कुणी केली मोठी मागणी?

मात्र या चिमुलीने विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिची हत्या केली. तर हत्या केलेल्या मुलीची बहीण घरच्यांना झालेला प्रकार सांगेल या भीतीने त्याने दुसऱ्या बहिणीचीही हत्या केली आणि दोघींचे मृतदेह घराशेजारी असलेल्या एका इमारातीजवळील ड्रममध्ये ठेवले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या (Pune) ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com