Sharad Pawar Statement On Pulwama Attack : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केंद्रातील भाजप (BJP) सरकारला सवाल केला आहे. पुलवामा हल्ल्या संदर्भात अनेक गोष्टी उघड झाल्या, मात्र याबाबत कोणताही तपास झाला नसल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, ठजम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. मात्र याबाबत कोणताही तपास झालेला नाही. 40 जवान शहीद झाले होते. सैन्याने विमानाची मागणी केली होती, पण ती नाकारण्यात आली. याशिवाय राज्यपालांना शांत राहण्यास सांगण्यात आले. ही बाब अधिक गंभीर आहे. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे."
शरद पवार पुढे म्हणाले, "गुजरामधील जातीय दंगलीतील अटकेतील सर्व दोषींची सुटका करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. वर्षानुवर्षे केस चालली. आता सर्व निर्दोष सोडले. आता ती हत्या कशाने झाली? कुणी हल्ला केला नसेल, तर हत्या कशी झाली? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे ज्यांची हत्या झाली ते गेले आणि दुसरीकडे सत्तेचा गैरवापर करून कायद्याचीही हत्या झाली आहे."
"ईडी, सीबीआय या संस्थांच्या माध्यमातून अनेकांना अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सुरुवातीला १०० कोटींचा आरोप करून ईडीची चौकशी केली. त्यांना १३ महिने तुरुगांत ठेवले. आता तपासानंतर एका शिक्षण संस्थेला मिळालेल्या एक कोटी देणगीचा मुद्दा पुढे आणला. माजी मंत्री नवाब मलिकांना दीड वर्षे तुरुंगात ठेवले आहे. आता १५ दिवसांनी सुनावणीची तारीख पुढे ढकलल्याची बातमी येते. खासदार संजय राऊतांनाही काही महिने तुरुंगात ठेवले. माजी मंत्री एकनाथ खडसेंवरही कारवाई झाली. खडसेंच्या जावायालाही दोन वर्षांपासून तुरुंगात ठेवले आहे. त्यांची केस न्यायालयात जात नाही.सत्तेचा गैरवापर यापेक्षा काय असू शकतो, " असे पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.