Sharad Pawar and Dilip Walse Patil: शरद पवार अन् दिलीप वळसे पाटील एकाच मंचावर येणं टळलं...

Shri Vighnahar Sahakari Sakhar Karkhana : विघ्नहरचा राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत होणारा गाळप हंगामाचा कार्यक्रम रद्द
Sharad Pawar and Dilip Walse Patil
Sharad Pawar and Dilip Walse PatilSarkarnama

Pimpri News: विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी शरद पवार हे गुरुवारी जुन्नरला जाणार होते. राज्याचे सहकारमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहणे भाग होते. पण, मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळल्याने आणि नेत्यांना गावात नो एंट्री करण्यात आल्याने पवारांचे जुन्नरला जाणे आज कॅन्सल झाले. त्यामुळे आता विघ्नहरचा राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत होणारा गाळप हंगामाचा कार्यक्रम रद्द झाला असून आता हा कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

एक तारखेला शरद पवार हे जुन्नरला दिवासी चौथरा तथा काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त बिरसा ब्रिगेडने आय़ोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी वळसेंनी त्यांचा सामना कसा करायचा म्हणून या परिषदेला निमंत्रित असूनही जाणे टाळले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Dilip Walse Patil
Ajit Pawar Health Update News : अजितदादांचा ताप 100 क्रॉस,प्लेटलेट्सही 80 हजार

आता, परवाच्या पवारांच्या विघ्नहरच्या गाळपाला ते हजर राहतील, असे कारखान्य़ाचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले होते. त्यामुळे वळसेंना सहकारमंत्री म्हणून या उपस्थित राहणे भाग होते. पण, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे आता दोन्ही नेते एका मंचावर येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठा आंदोलन तीव्र झाल्याने पवारच नाही, तर वळसेही या सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही, अशी शंका 'सरकारनामा'ने `रोहितदादांनी संघर्ष यात्रा थांबवली, अजितदादांनी गाळपाला जाणे टाळले; आता शरद पवार त्याला जाणार का?` या हेडिंगने दिलेल्या बातमीत नुकतीच व्यक्त केली होती. ती आज खरी ठरली.

Sharad Pawar and Dilip Walse Patil
Maan MIDC News : 'कॉरिडाॅर'साठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती; प्रभाकर देशमुख जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

अत्यंत विश्वासू असूनही वळसे हे अजित पवार गटात गेल्याने शरद पवार हे त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. ते त्यांच्या आंबेगाव मतदारसंघात सभा घेऊन केलेल्या गद्दारीचा जाब वळसेंना विचारणार होते. पण, ही सभा न झाल्याने आदिवासी परिषदेला हजर राहून त्यांनी वळसेंच्या आदीवासी मतांना खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर ते त्यांच्या विरोधकांना बळ देऊ लागले होते. त्यासाठीच ते परवा पुन्हा जु्न्नरला येणार होते. पण, आपण मराठा आंदोलनात सहभागी असल्याचे सांगत शेरकर यांनी पवारांसह सर्वच नेत्यांना येऊ नका, असा निरोप आज दिला. तसेच मराठा मोर्चा समन्वयकाच्या हस्ते त्यांनी कारखान्याचा गळीत हंगाम आता परवा नाही, तर उद्याच (ता.१) उसाची मोळी टाकून ते सुरु करणार आहेत.

अजितदादाही गळीत हंगामाला जाणार नाहीत

पिंपरी-चिंचवडच्या वेशीवर असलेल्या कासारसाई (ता.मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम हा शुक्रवारी (ता.३) उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मोळी टाकून सुरु करण्यात येणार होता. पण, आता ते ही येणार नाहीत. ही शंका गृहित धरून कारखान्याच्या संचालक मंडळाने बी प्लॅन तयार ठेवला होता.

त्यानुसार आता संतोष महाराज तायगुडे आणि मारुतीबाबा कुऱ्हेकर यांच्या हस्ते हा हंगाम सुरु केला जाणार आहे, अशी माहिती संचालक बाळासाहेब विनोदे यांनी दिली. अजित पवार हे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला येण्याची शक्यता कमी असल्याचे सरकारनामाने तीन दिवसांपूर्वीच्या बातमीतच म्हटले होते. ही शक्यताही खरी ठरली.

Edited By- Ganesh Thombare

Sharad Pawar and Dilip Walse Patil
Cabinet Meeting : राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com