Ajit Pawar Health Update News : अजितदादांचा ताप 100 क्रॉस, प्लेटलेट्सही 80 हजार

NCP Ajit Pawar News : अजित पवारांच्या मेडिकल हेल्थबाबत मोठी अपडेट समोर....
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Mumbai News : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापलेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणावरून अॅक्शन मोडवर आले असून, भेटीगाठी, बैठकांचा धडाका लावला आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना अॅक्टिव्ह मोडवर दिसत नव्हते.

यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते, पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना डेंग्यू झाल्याची माहिती दिली. तरीदेखील चर्चा थांबत नव्हत्या. अखेर आता अजित पवारांच्या मेडिकल हेल्थबाबत मोठी अपडेट समोर आली आहे

Ajit Pawar News
Maratha Reservation : मरतोय मराठा, जळतोय मराठा... ; मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या तब्येतीबाबत डाॅक्टरांनी मीडियाशी संवाद साधला. या वेळी डॉ. संजय काकोटे म्हणाले, अजितदादा यांना मागील चार-पाच दिवसांपासून डेंग्यू झालेला आहे. आतासुद्धा त्यांना 101 ताप आहे. वीकनेस प्रचंड आहे. अजून त्यांना विश्रांतीसाठी घरीच ठेवले असल्याची डॉ. काकोटे यांनी माहिती दिली.(Latest MarathI News)

तसेच जर गरज लागली तर अॅडमिट करावे लागेल. प्लेटलेट्ससाठी उद्या टेस्ट करणार आहोत. तेव्हा उद्याच ठरवू की, यांना अॅडमिट करायचे की नाही हे ठरवावं लागणार आहे. डेंग्यू हा व्हायरल डिसीज आहे. त्यामुळे वीकनेस खूप आहे. लवकरच दादा पुन्हा एकदा काम करताना दिसतील. सध्या अजित पवार यांना 80 हजार प्लेटलेट्स आहेत. उद्या पुन्हा टेस्ट केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले. (Maratha Reservation)

डॉ. संजीव वावरे म्हणाले, एका व्यक्तीच्या शरीरात साधारणपणे दीड ते साडेतीन लाख प्लेटलेट्स अपेक्षित असतात. मात्र, हा आकडा 50 हजारापर्यंत जरी कमी झाला तरी काहीही अडचण येत नाही. परंतु, ज्या व्यक्तीचे प्लेटलेट्स 80 हजारांपेक्षा कमी होतात. तेव्हा मात्र रोजच्या रोज त्याचे काउंट करून नियंत्रण करणे अपेक्षित आहे. डेंग्यू झाल्यानंतर ताप हा किमान पाच ते सहा दिवस 100 पेक्षा अधिक असतो.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले होते...?

प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या प्रसारमाध्यमांच्या बातम्या येत आहेत. पण अजित पवार याना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. तसेच अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. अजित पवार पूर्ण बरे झाले की, ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी पूर्ण शक्तीने परततील.

Ajit Pawar News
Maan MIDC News : 'कॉरिडाॅर'साठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती; प्रभाकर देशमुख जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

राज्यात अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या सुरू झाल्या होत्या, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये रंगत होत्या. तसेच मराठा समाजसुद्धा अजित पवारांविरोधात आक्रमक झाला असून, काल त्यांचा बारामतीचा दौरा रद्द झाला होता. पण आता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar News
Shivena Shinde Group News : शिंदे गटाला नगरमध्ये मोठा धक्का; 28 जणांचे सामूहिक राजीनामे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com