Shrirang Barne : मावळमध्ये महायुतीचा विजय निश्चित, बारणे हॅटट्रिकचा रेकॉर्ड करणार

Maharashtra Lok Sabha Results : शिवसेनेच्या नाही,तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताकदीवर मावळात महायुतीचा विजय
Shrirang Barne
Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : लोकसभेचे निकाल महाराष्ट्रात देशांपेक्षा वेगळा लागताना दिसतो आहे. देशात एनडीए आघाडीवर असली तरी महाराष्ट्रात ती म्हणजे महायुती पिछाडीवर पडली आहे.मात्र,मावळमध्ये महायुतीच्या (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणेंचा विजय नक्की झाला आहे.त्यातून त्यांचा खासदारकीचा रेकॉर्डही होणार आहे.

महाराष्ट्रात मोदी लाट यावेळी दिसली नाही. उलट ती उद्धव ठाकरे व शरद पवारांचा पक्ष फोडला गेल्याने त्यांच्याविषयी सहानुभूतीची दिसून आली.त्यामुळे आघाडी ही महायुतीवर राज्यात सरस ठरते आहे.मात्र,मावळमध्ये त्यांचे बारणे हे विजयाच्या जवळपास पोचले आहेत. फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या फेऱ्या बाकी राहिल्या असताना त्यांचे लीड हे ९० हजाराच्या घरात गेले आहे.तर,एकूण सव्वापाच लाख मते त्यांनी घेतली आहेत. त्यामुळे त्यांची हॅटट्रिक नक्की झाली आहे.राज्यात आघाडीच्या ठाकरे,पवारांची जादू दिसत असताना मावळमध्ये ती पुरेशी न दिसल्याने त्यांचा उमेदवार पराभवाच्या छायेत गेला.

यावेळी मावळात गेल्यावेळेसारखी एकांगी लढत झाली नाही. गतवेळी बारणेंनी आपले प्रतिस्पर्धी पार्थ अजित पवार यांचा दोन लाख १५ हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी,मात्र त्यांना आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील यांनी जोरदार लढत दिली. काही फेऱ्यांत तर,त्य़ांनी आघाडीही घेतली होती.मात्र, नंतर ती तोडून बारणेंनी ती घेतली.नंतर ती फेरी गणिक वाढवत नेली.मतदारसंघात शिंदे शिवसेनेचा एकही आमदार नसताना बारणे निवडून येणार आहेत,हे विशेष. त्यांच्या विजयात मावळमधील भाजपच्या तीन,राष्ट्रवादीच्या दोन आणि एका भाजप संलग्न आमदाराचा सिंहाचा वाटा आहे.

अडीच लाखांपेक्षा अधिक लीडने निवडून येऊ असा दावा बारणेंनी केला होता. ते निवडून आले.मात्र,त्यांनी सांगितलेले लीड त्यांना मिळणार नाही.दुसरीकडे वाघेरेंनी पावणेदोन लाखांनी विजयी होऊ,असे सांगितले होते.पण,ते खरे झाले नाही. फुटीनंतर शिवसेनेची ताकद विभागली गेल्याचा फटका त्यांना बसला. तर, आघाडीतील कॉंग्रेसची मतदारसंघात नगण्य अस्तित्व असल्याची बाबही त्यांच्या विरोधात गेली. शरद पवार राष्ट्रवादीचे ही बळ मावळमध्ये तोकडेच होते. ही बाजूही वाघेरेंच्या विरोधात गेली.उलट, शिंदे शिवसेनेची ताकद मावळमध्ये कमी असूनही बारणे निवडून आले. कारण तेथे मोठी ताकद असलेला भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी त्यांच्या कामी आली.दोन टर्म विद्यमान खासदार असल्याचा फायदा त्यांना झाला.

Shrirang Barne
Nana Patole : एक था टायगर, एकट्या विदर्भात दहापैकी सात जागांवर पटोलेंच्या कॉंग्रेसला लीड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com