Shubhangi Patil News : तांबेंना आव्हान देणाऱ्या शुभांगी पाटलांकडे ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Shiv Sena News : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.
Shubhangi Patil News
Shubhangi Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. आमदार सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरून सगळ्यांनाच धक्का दिला होता. त्यानंतर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध आघाडीच्या पाटील असा सामना रंगला होता. यामध्ये तांबे विजयी झाले असले तरी पाटील यांनी चांगली लढत दिली होती. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटील यांच्यावर उपनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

पाटील यांच्या रूपाने ठाकरे यांना उत्तर महाराष्ट्रात तरुण चेहरा मिळाला आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर तांबे यांचा विजय सहज होईल, असे सांगितले जात होते. मात्र, अपक्ष अर्ज भरलेल्या पाटील यांनी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळवत निवडणूक लढवली. त्यामुळे नाशिकची निवडणूक राज्यभरात गाजली.

Shubhangi Patil News
Meera Borwankar News : बोरवणकरांनी केली अजितदादांची कोंडी; त्यांनीच जागा हस्तांतरित करायला सांगितल्याचा पुनरुच्चार

निवडणुकीनंतर पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता शिवसेना ठाकरे गटाच्या विस्तारीत कार्यकारिणीमध्ये पाटील यांना संधी मिळाली आहे. त्यांच्यावर थेट उपनेतेपदाची जबाबदारी देत उत्तर महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटन अधिक बळकट करण्याकडे ठाकरे गटाने लक्ष दिल्याचे दिसते. नाशिक पदवीधर मतदारसंघात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे येतात. यामध्ये नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांचा समावेश होतो.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची मोठी ताकद होती. मात्र, पक्षातील फुटीनंतर अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे आपला गट पुन्हा बळकट करण्याबरोबरच विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करण्याचा एक दृष्टिकोन ठाकरे यांचा या पाटील यांच्या निवडीमागे दिसतो.

सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलीच टक्कर दिली. विधान परिषदेच्या पाच जागांमध्ये आघाडीत नाशिकची जागा ठाकरे गटाला वेळेवर सोडण्यात आली होती. ठाकरे गटाने पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता आगामी निवडणुकीतही या जागेवर 'इंडिया' आघाडीत ठाकरेंचा दावा असणार आहे. त्यामुळे पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Edited by : Amol Jaybhaye

Shubhangi Patil News
Karmala Bazar Samiti : जयवंतराव जगताप पुन्हा होणार सभापती; विजयादशमीच्या मुहूर्तावर गेलेली सत्ता त्याच दिवशी मिळविणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com