Meera Borwankar News : बोरवणकरांनी केली अजितदादांची कोंडी; त्यांनीच जागा हस्तांतरित करायला सांगितल्याचा पुनरुच्चार

Meera Borwankar, Ajit Pawar News : पुणे पोलिसांच्या येरवड्यातील तीन एकर जमिनीचा २०१० मध्ये विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता.
Meera Borwankar, Ajit Pawar News
Meera Borwankar, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Meera Borwankar Press Conference : पुणे पोलिसांच्या येरवड्यातील तीन एकर जमिनीचा २०१० मध्ये विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता. मात्र, ही जागा एका बिल्डरला देण्यासाठी माझा विरोध होता. अजित पवार यांनी लिलाव केला नाही, हे सत्य आहे. मात्र, प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे तुम्ही जागा हस्तांतरित करा, असे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या कार्यालय आणि घरांसाठी आवश्यक असल्याचे सांगत जमिनीच्या हस्तांतरास नकार दिला होता, असे माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

बोरवणकर यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात त्यांचे पोलिस (Police) दलातील अनुभव कथन केले आहे. या पुस्तकासंदर्भात त्यांनी दिल्लीत सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी येरवड्यातील जागेसंदर्भात सविस्तर भाष्य केले. त्या म्हणाल्या, पुणे पोलिसांच्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली होती. माझ्याकडे कार्यभार असल्याने ही जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना मला करण्यात आली होती. अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. ही जागा एका बिल्डरला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, मी आयुक्त झाल्यानंतर ही जागा देण्यास विरोध केला.

Meera Borwankar, Ajit Pawar News
Amol Mitkari On Borwankar : बोरवणकरांचा बोलविता धनी शरद पवार गटातील नेता ? आमदार मिटकरींचा 'हा' खळबळजनक दावा

ही जागा पुणे (Pune) पोलिसांची आहे, भविष्यातील पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या जागेत पोलिसांचे कार्यालय बांधण्यात येणार आहे. तसेच तेथे पोलिस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मी सांगितले. मात्र, तत्कालीन पालकमंत्री म्हणाले, सगळी प्रक्रिया झालेली आहे, त्यामुळे तुम्ही फक्त जागा हस्तांतरित करा, त्यावर मी सांगितले सगळी प्रक्रिया झालेली आहे, तर मग माजी आयुक्तांनीच जागा हस्तांतरित का केली नाही. त्यानंतर मला तत्कालीन गृहमंत्री म्हणाले, होते मॅडम तुम्ही यात पडू नका, असेही बोरवणकर म्हणाल्या.

मी जागा देण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आणि आमची मीटिंग झाली. ही जागा पुणे पोलिसांसाठी महत्त्वाची आहे, असे सांगिल्यानंतर आर. आर. पाटील यांनी सरकारचे धोरण बदलले आणि जागेच्यासंदर्भातील प्रक्रिया रद्द झाली, असेही बोरवणकर यांनी स्पष्ट केले. ही जागा शाहिद बलवा यांना देण्यात येणार होती, असेही बोरवणकर यांनी सांगितले. पोलिसांची जागा वाचवल्याबद्दल मला अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी फोन केले आणि सांगितले की, तुम्ही पोलिसांची जागा वाचवली चांगले काम केले.

या पुस्तकामध्ये अनेक प्रकरणे आहेत. मात्र, यातील फक्त एकच प्रकरण काढून बातम्या दिल्या जात आहेत. पुस्तक वाचा आणि नंतर निर्णय घ्या, असा सल्लाही बोरवणकर यांनी माध्यमांना दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हे प्रकरण बाहेर आले, यामध्ये काही राजकारण आहे का ? असा सवाल बोरवणकर यांना करण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले, मी पुस्तक एक वर्षापूर्वीच लिहिले आहे. पुस्तकाच्या छपाईसाठी वेळ गेला, त्यामुळे त्यामध्ये राजकारण असे काहीच नाही.

Edited by : Amol Jaybhaye

Meera Borwankar, Ajit Pawar News
Manoj Jarange Patil News : वेळ पडली तर आरक्षणासाठी मराठा, धनगर अन् मुस्लिम..., जरांगे यांचे सूचक वक्तव्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com