लाकडी-निंबोडी योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही; पवारांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन!

गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या पाणी योजनेसाठी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद
Sharad Pawar-Dattatray Bharane
Sharad Pawar-Dattatray BharaneSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे ) : गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे. या योजनेचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांच्या हस्ते लवकरच होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatrey Bharane) यांनी दिली. (Signature of Chief Minister on the file of Lakdi-Nimbodi Irrigation Scheme : Dattatrey Bharane)

इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी जलसिंचन योजना गेल्या गेल्या पंचवीस वर्षांपासूनच्या निवडणुकीत गाजत आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील राजकीय पुढारी ही योजना पूर्ण करण्याचे आश्‍वासन देत आहेत. अनेकदा निवडणुकीमध्ये या योजनेचे आश्‍वासन देवून गुढ्याही उभारण्यास सांगितले होते. या योजनेसाठी यापूर्वीच उजनीच्या पाणी वाटपामध्ये तरतूद करण्यात आली आहे. मात्र, योजनेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च असल्याने योजनेचे काम रखडले होते.

Sharad Pawar-Dattatray Bharane
मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी!

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जोरदार पाठपुरावा व प्रयत्न या योजनसाठी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या योजनेचा फायदा इंदापूर तालुक्यातील लाकडी, निंबोडी, काझड, लामजेवाडी, म्हसोबाचीवाडी, शेटफळगढे, निरगुडे, शिंदेवाडी या आठ गावांना तसेच बारामती तालुका जैनकवाडी, पारवडी, रुई, सावळ, वंजारवाडी, कन्हेरी, जळोची या सात गावांना होणार असून दोन्ही तालुक्यांतील सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

Sharad Pawar-Dattatray Bharane
आमदार बबनराव शिंदेंचे चिरंजीव अडचणीत; कर्जप्रकरणाच्या फेरचौकशीचे कोर्टाचे आदेश

उजनी जलाशयातून वीजपंपाद्वारे उचलून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याचे नियाेजन आहे. ज्या ठिकाणी नीरा डाव्या कालव्याचे व खडकवासला कालव्याचे पाणी जात नव्हते, त्या गावांतील शेतकऱ्यांना या योजनेतून पाणी मिळण्यास मदत होणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर या योजनेच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून मे-जूनमध्ये या योजनेच्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असेही भरणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com