'भोंगे बंद करा,' म्हणण्याचे कारण काय ; राज ठाकरेंना अजितदादांचा सवाल

राज्याच वातारण गढूळ करण्याचे काम सुरु आहे.
Ajit Pawar, raj Thackeray
Ajit Pawar, raj Thackeraysarkarnama

बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray)यांनी मशिदीवरच्या भोंग्यांवर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये (mns)दुफळी निर्माण झाली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. तीन दिवसात तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या त्या विधानावर भाष्य केलं आहे. पवारांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. केज तालुक्यातील येडेश्वरी कारखान्यातील आसवानी प्रकल्पाचे उद॒घाटन काल पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

''राज्यात कोळशाचा तुटवडा असल्याने वीज भारनियमन करावे लागत आहे. आता रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह रमनाज महिना सुरु आहे. आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात असताना राज्याच वातारण गढूळ करण्याचे काम सुरु आहे. आता भोंगे बंद करा म्हणण्याचे कारण काय,'' असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, माजी आमदार अमरसिंह पंडित, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, महादेव महाराज बोराडे, पृथ्वीराज साठे, विजयसिंह पंडित, राजेश्वर चव्हाण, कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.

Ajit Pawar, raj Thackeray
फडणवीसांच्या काळातील आणखी एक योजना ठाकरे सरकारने गुंडाळली

अजित पवार म्हणाले, ''सर्व ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करु नका. रिकव्हरीचे नुकसान भरुन काढण्यासह वाहतूक अनुदान देण्यात येईल, कारखान्यांचे नुकसान होऊ देणार नाही. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता बंद झालेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर पाठविण्याबाबत साखर आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. याबाबतचा निर्णय झाला आहे,''

''कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे भर द्यावा, पुणे, सातारा, सांगली जिल्हा बँका शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शुन्य टक्के व्याजाने पैसे देतात. मराठवाड्यातील जिल्हा बँकांची स्थिती चांगली नाही. अपवाद लातूरचा असून औरंगाबाद बँक बरी चाललीय. बाप- जाद्यांनी उभारलेल्या संस्था चांगल्या चालवायला शिका,'' असे म्हणत दिवंगत गोपीनाथराव मुंडेंच्या काळात चांगला चालणाऱ्या वैद्यनाथ कारखान्याची काय अवस्था पहा, असा टोला पवारांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता लगावला.

Ajit Pawar, raj Thackeray
Silver Oak Attack : माध्यमांना माहिती मिळते, मग,पोलिसांना का नाही ; अजितदादांचा सवाल

''स्टील, सिमेंटच्या भावांत मोठी वाढ झाली आहे. यात केंद्र सरकारने लक्ष घालावे.आम्ही गॅसवरील एक हजार कोटी रुपयांचा टॅक्स कमी केला. कोरोना गेला असे गृहीत धरु नका, मुंबईत नवा व्हेरीएंट आढळला आहे, '' असे पवार म्हणाले. यावेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, प्रकाश महाराज बोधले यांचीही भाषणे झाली. बाळकृष्ण भवर यांनी प्रस्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com