सोमय्या करणार भाजप नेत्यांचीही चौकशी : संजय राऊतांचे ते आव्हान स्वीकारले

भाजप नेत्याच्या भ्रष्टाचाराची ईडीकडून चौकशी लावावी, यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्यांना (Kirit Somaiya) पत्र व फाईल दिली होती.
Sanjay Raut & Kirit Somaiya
Sanjay Raut & Kirit SomaiyaSarkarnama

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या कामात पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC) पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आणि तक्रार शिवसेनेने (Shivsena) केली आहे. या गैरव्यवहाराची पुराव्यासहित फाईल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) ईडीकडून (ED) चौकशी करण्यासाठी ११ ऑक्टोबरला दिली. त्याची त्यांनी दखल घेतली असून या फाईलचा अभ्यास करून या आठवड्यात राऊत यांना उत्तर देणार असल्याचे सोमय्या यांनी सोमवारी (ता.२५ ऑक्टोबर) `सरकारनामा`ला सांगितले.

Sanjay Raut & Kirit Somaiya
शरद पवार, चंद्रकांत पाटलांपाठोपाठ केजरीवालांचेही पिंपरी पालिका निवडणुकीवर लक्ष!

पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराची ईडीकडून चौकशी लावावी, यासाठी राऊत यांनी सोमय्यांना दिलेल्या पत्र व फाईलची ते दखल घेतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड भेटीत सांगितले होते. ते खरे ठरले आहे. भाजप सत्ताधारी पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीवर एसीबीची १८ ऑगस्टची एसीबीची धाड, त्यात एक लाख १८ हजाराची लाच घेताना पकडले गेलेले स्थायी समिती अध्यक्ष व चार पालिका कर्मचारी, त्यासोबत स्मार्ट सिटीच्या कामामधील शहरातील भ्रष्टाचार संदर्भात राऊत यांनी सोमय्यांकडे तक्रार देऊनही ते त्यावर गप्प आहेत. मात्र, इतर गैरव्यवहार प्रकरणी ते राज्यभर फिरत आहेत, यासंदर्भात पाटील यांना यावेळी विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सोमय्या हा मनाचा राजा असून याप्रकरणी पिंपरीत यायचे की नाही, ते तोच ठरवेल, असे सांगितले होते.

संजय राऊतांना ट्विटव्दारे दिले उत्तर..

या प्रकरणावर सोमय्या यांनी आज (ता.25 ऑक्टोबर) ट्विटव्दारे भाष्य केले. ते म्हणाले की, राऊत यांच्या या पत्राला येत्या काही दिवसांतच उत्तर देणार आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आपल्या लढ्याचे कौतूक केल्याबद्दल त्यांनी राऊतांना धन्यवादही दिले आहेत. त्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या कामात झालेल्या पाचशे ते सातशे कोटींच्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा अभ्यास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तो झाल्यानंतर या आठवड्यातच राऊत यांना उत्तर देणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ते काय उत्तर देणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपची पिंपरी पालिकेत असलेली सत्ता लक्षात घेता ते या प्रकरणात क्लिनचीट देण्याची शक्यता अधिक आहे. तसेच, ज्या कंपनीच्या कामात हा घोटाळा झाला आहे, ती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांची आहे.

Sanjay Raut & Kirit Somaiya
पिंपरी महापालिकेत अवतरले किरीट सोमय्या...

दरम्यान, सोमय्या हे या प्रकरणी क्लिनचीटच देतील, असा अंदाज राऊत यांनी सोमय्यांना दिलेल्या पत्रातच व्यक्त केला आहे. जर, तुमच्या चौकशी आणि अभ्यासात या प्रकरणातील आरोप निराधार निघाले, तर ज्यांच्यावर ते लावण्यात आले आहेत, त्यांना सार्वजनिकरित्या क्लिनचीट द्या, असा उपरोधक टोला राऊतांनी पत्रात लगावला आहे.

पत्रात राऊत सोमय्यांना म्हणाले, प्रत्येक ठिकाणचा भ्रष्टाचार उघड करणारे असे नाव आपण कमावले आहे. तुमच्या या प्रयत्नामुळे अनेक सरकारी अधिकारी आणि नेत्यांना जेलची हवा खायला लागल्याबद्दल तुमचे आभारच मानले पाहिजेत. त्यामुळे जेथे कोठे सरकारी पैशाचा अपहार वा गैरव्यवहार होतो. तेथे पहिल्यांदा तु्मचे नाव डोळ्यासमोर येते. मलाही तुमच्याकडे येण्याची एक अशीच संधी चालून आली आहे. महिन्याभरापूर्वीच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यात सुलभा उबाळे आणि शिवसेनेच्या इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची फाईल दिली. पन्नास टक्के काम पूर्ण झाले नसताना या कामात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. क्रेस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी डोळ्यासमोर ठेवूनच या कामाची निविदा काढण्यात आली. तिच्या अटी व शर्ती अशा तयार केल्या गेल्या की हे काम क्रेस्टेललाच भेटेल. नंतर ते त्यांनाच भेटले. त्यांच्या कामातच हा घोटाळा झालेला आहे. तुम्ही जी प्रकरणे ईडीसारख्या यंत्रणांकडे नेता त्याची चौकशी लागते असा समज झालेला आहे. त्यामुळे थेट ईडी वा इतर सबंधित तपास यंत्रणांकडे पिंपरीतील स्मार्ट घोटाळ्याची फाईल न पाठवता ती मी तुमच्याकडेच देत आहे. अलिकडच्या काळात झालेल्या सर्वात मोठ्या या घोटाळ्याचा अभ्यास व तपास करून तो तुम्ही पुढे ईडीकडे पाठवाल, अशी आशा आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com