पवारांना कडवी टक्कर देणाऱ्या सतीश काकडेंचा यंदा पॅनेल नाही

उपमुख्यमंत्र्यांशी विकासाच्या मुद्द्यावर सातत्याने सुसंवाद सुरू आहे.
Satish Kakde
Satish KakdeSarkaranama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कृती समिती पॅनेल उभी करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आज (ता. २८ सप्टेंबर) जाहीर केली. यामुळे आता सोमेश्वर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल विरूध्द भाजप पुरस्कृत पॅनेल अशी होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. (Someshwar Sugar Factory's election will not contest : Satish Kakade)

काकडे गटाचे प्रमुख सतीश काकडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००२ मध्ये चर्चेतून सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली होती. यानंतर २००७ मध्ये काकडे गटाच्या वतीने राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला तगडे आव्हान दिले होते. त्यावेळी काकडे यांना अल्प कमी मतांनी पराभवास सामोरे जावे लागले होते. पुन्हा २०१५ मध्ये सतीश काकडे यांनी काकडे गटाची मोळी बांधत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला आव्हान दिले. त्यावेळी राष्ट्रवादीने अनपेक्षितपणे मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला होता. उपमुख्यमंत्र्यांनी कोऱ्या चेहऱ्यांच्या सोबतीने स्वतःच ही निवडणूक हातात घेऊन यश मिळविले होते. आताच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे सव्वाचारशेच्या आसपास उमेदवारी अर्ज असताना शेतकरी कृती समितीचेही पन्नास उमेदवारी अर्ज आहेत. तर भाजप आघाडीकडून ३० अर्ज आहेत. यानंतरही शेतकरी कृती समितीच्या गोटात शांतता असल्याने ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

Satish Kakde
संजय जगतापांना साध्या साध्या गोष्टींसाठीसुद्धा इतरांचे उंबरे झिजवावे लागतायेत

आज सतीश काकडे यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. यानंतर दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पॅनेल उभा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील काळात उपमुख्यमंत्र्यांशी विकासाच्या मुद्द्यावर सातत्याने सुसंवाद सुरू आहे. त्यांनीही विकासाबाबत योग्य भूमिका घेतली असून समविचारी लोकांना घेऊन वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुषंगाने तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी आणि कारखान्याचा निवडणुकीचा खर्च वाचावा, या उद्देशाने पॅनेल उभा करत नसल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले. समितीच्या कार्यकर्त्यांनीही काकडे यांच्यासोबतच राहणार असल्याचे बैठकीत सांगितले.

Satish Kakde
ओसाड गावचे सेनापतीपद सांभाळून थकलोय; आता काहीतरी जबाबदारी द्या

दरम्यान, यामुळे कृती समितीचे किती लोक अर्ज माघारी घेतात आणि समविचारी लोकांना पुढे घेऊन जाण्याचे सूतोवाच करणारे अजित पवार कृती समितीमधील कुणाकुणाला सोबत घेतात, याबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी आधीच अजित पवारांसोबत राहणार असल्याचे स्षष्ट केले आहे. आता कृती समितीनेही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता लढत झाली तर राष्ट्रवादी पुरस्कृत 'सोमेश्वर विकास पॅनेल' आणि भाजपा पुरस्कृत 'सोमेश्वर परिवर्तन पॅनेल' यांच्यातच होईल असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com