Sonali Bendre : सोनाली बेंद्रे अडचणीत! मावळच्या शेतकऱ्याने थेट कोर्टात खेचलं; नेमकं प्रकरण काय?

Sonali Bendre legal controversy details : बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत सापडली असून मावळच्या शेतकऱ्याने कोर्टात धाव घेतली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Sonali Bendre in Legal Trouble
Sonali Bendre in Legal TroubleSarkarnama
Published on
Updated on

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल सध्या एका जमीन वादामुळे अडचणीत सापडले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तब्बल 30 गुंठे जमिनीच्या व्यवहारावरून त्यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ येथील न्यायालयात चंद्रकांत बाळू शिंदे यांनी हा दावा केला असून, या व्यवहारात फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मौजे उकसान येथील सर्व्हे नंबर 121/1 मधील ही जमीन त्यांच्या कुटुंबाच्या वहिवाटीतील असून 1 एप्रिल 1957 पासून त्यांच्या आजोबांच्या नावावर आहे. या जमिनीवर कुळ हक्क असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sonali Bendre in Legal Trouble
Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची अपडेट; E-KYC साठी पुन्हा मिळाली मुदतवाढ! आदिती तटकरेंचे लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट!

मात्र, मूळ मालकाने ही जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्या व्यक्तीला विकली आणि नंतर तीच जमीन पुढे सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच डिसेंबर 2025 मध्ये या जागेवर प्रत्यक्ष भेटीदरम्यान वाद झाल्याचाही उल्लेख दाव्यात करण्यात आला आहे.

दरम्यान, सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या बाजूने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सोनाली बेंद्रे यांच्या नावावर ही जमीन नसून त्यांचा या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच 8 जून 1965 रोजी तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित व्यक्ती ही जमीन मालकी हक्काची नसल्याचे स्पष्ट झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

Sonali Bendre in Legal Trouble
IAS Sisters Transfer: सख्ख्या IAS बहिणींची एकाच वेळी बदली 'हे' मोठे कारण आलं समोर

यापूर्वीही या प्रकरणावर अनेक वेळा प्रशासकीय स्तरावर सुनावणी झाली असून, प्रत्येक वेळी निर्णय तक्रारदाराच्या विरोधात गेला असल्याचा बचाव पक्षाचा दावा आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ आर्थिक फायदा मिळवण्यासाठी वारंवार पुढे आणले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता या संपूर्ण वादावर न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com