Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची अपडेट; E-KYC साठी पुन्हा मिळाली मुदतवाढ! आदिती तटकरेंचे लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट!

Aditi Tatkare scheme Ladki Bahin Yojana update : लाडकी बहीण योजनेसाठी eKYC करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरेंकडून महिलांना मोठा दिलासा. नवीन तारीख आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Aditi Tatkare
Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on

लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ईकेवायसी प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ज्या महिलांचे केवायसी अद्याप पूर्ण झाले नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती राहिल्या आहेत, आता त्यांना सुधारणा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

ईकेवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती. मात्र, अनेक महिलांकडून आलेल्या तक्रारी आणि अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गारपीट, तांत्रिक अडचणी तसेच चुकीची माहिती भरल्यामुळे अनेकांना लाभ मिळण्यात अडथळे येत होते. काहींनी अर्ज करताना चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचे पैसे थांबले होते.

Aditi Tatkare
IAS Transfer News : प्रशासनात फेरबदलाचे वारे! 24 दिग्गज अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश; वीर विक्रम यादव यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महिलांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ईकेवायसीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात येत आहे. आता 30 एप्रिल 2026 पर्यंत सर्व लाभार्थींनी आपली ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

ही मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे केवायसी अपूर्ण आहे किंवा ज्यांना सुधारणा करायची आहे, त्यांनी ही संधी नक्कीच वापरावी.

Aditi Tatkare
Congress News : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर तीन वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष भाकरी फिरवणार!

यामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार असून, योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com