IAS Sisters Transfer: सख्ख्या IAS बहिणींची एकाच वेळी बदली 'हे' मोठे कारण आलं समोर

Tina Dabi and Ria Dabi new responsibilities: IAS अधिकारी टीना डाबी आणि रिया डाबी पुन्हा चर्चेत. दोघींना नवी जबाबदारी देण्यात आली असून बदलीमागील मोठं कारण समोर आलं आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
IAS Sisters Tina Dabi and Ria Dabi
IAS Sisters Tina Dabi and Ria DabiSarkarnama
Published on
Updated on

राजस्थानच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा आयएएस अधिकारी टीना डाबी आणि रिया डाबी या दोन बहिणी चर्चेत आल्या आहेत. राज्य सरकारने एकूण 65 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून, त्यामध्ये या दोघींना देण्यात आलेल्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे विशेष चर्चा रंगली आहे.

टीना डाबी यांची बाडमेर जिल्हाधिकारी पदावरून बदली करून त्यांची नियुक्ती टोंक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. बाडमेरसारख्या सीमावर्ती भागात त्यांनी कडक प्रशासन आणि प्रभावी कामकाजातून वेगळी ओळख निर्माण केली होती. आता त्यांना टोंकसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

IAS Sisters Tina Dabi and Ria Dabi
धसांच्या आरोपवर फडणवीसांचे उत्तर! अमिताभ गुप्ता–जालिंदर सुपेकरांना मोठा दिलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

टोंक हा प्रदेश काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या प्रभावाखाली मानला जातो. अधिकृतरीत्या हा बदल नियमित प्रशासकीय फेरबदल असल्याचे सांगितले जात असले, तरी सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, रिया डाबी यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण येथे थेट राज्याच्या सर्वोच्च स्तरावर काम करण्याची संधी मिळते. धोरणात्मक निर्णय, फाइल्सची देखरेख आणि विविध विभागांमधील समन्वय साधण्याची जबाबदारी या पदावर असते. त्यामुळे रिया डाबी यांच्यावर सरकारने दाखवलेला विश्वासही यामधून स्पष्ट झाला आहे.

IAS Sisters Tina Dabi and Ria Dabi
Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची अपडेट; E-KYC साठी पुन्हा मिळाली मुदतवाढ! आदिती तटकरेंचे लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट!

याशिवाय, जितेंद्र सोनी यांची माहिती व जनसंपर्क विभागात नियुक्ती झाली आहे. जयपूरमध्ये संदेश नायक यांना जिल्हाधिकारी करण्यात आले असून, उदयपूरमध्ये गौरव अग्रवाल, बीकानेरमध्ये निशांत जैन, करौलीमध्ये अक्षय गोदारा, जोधपूरमध्ये आलोक रंजन यांची नियुक्ती झाली आहे. तसेच जैसलमेरमध्ये अनुपमा जोरवाल, बाडमेरमध्ये चिन्मयी गोपाल, प्रतापगडमध्ये शुभम चौधरी आणि सीकरमध्ये आशीष मोदी यांना जिल्हाधिकारीपद देण्यात आले आहे. फलोदीमध्ये अंकित कुमार सिंह आणि बारांमध्ये बाल मुकुंद असावा यांनाही नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com