Maharashtra Political Crisis: पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट? कोण कुठल्या मेळाव्याला उपस्थित होतं?

NCP Crisis And Pune: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडून आज मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.
NCP Crisis
NCP CrisisSarkarnama
Published on
Updated on

NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला. यानंतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा मुंबईत मेळावा पार पडला. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांना सुनावलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडून आज मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. असे असतानाच पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे चित्र आहे. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ व तरुण पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. तर अजित पवारांना साथ देण्यासाठी अनेक माजी नगरसेवक, संघटनेतील पदाधिकारी मुंबईला गेले होते.

NCP Crisis
NCP Crisis And Pune MLAs : आधी अजितदादांवर टीका, नंतर दिली साथ; पुण्यातील 'या' आमदाराचा 'यू टर्न'

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे हा कायम बालेकिल्ला राहिलेला आहे. पुणे जिल्ह्यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, आता राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांसह आमदारांनी बंड केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. यानंतर आता नेमकी कोणती भूमिका घ्यायची, यावरून कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

तर थेट समोर येऊन भूमिका घेण्यास काही कार्यकर्त्यांनी नकार दिला होता. शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्या बाजून उभे राहण्याचा निर्णय घेतला गेला. पण आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीला दोन्ही गटात पदाधिकारी उपस्थित होते.

NCP Crisis
NCP Crisis Vs Shivsena Crisis : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडात काय आहे साम्य आणि वेगळेपण...?

शरद पवारांच्या बैठकीला पुण्यातून कोण उपस्थित होतं?

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीला पुण्यातून खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, दीपाली धुमाळ, काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी, महेश हांडे, बाळासाहेब रायकर, शरद डबडे, कुणाल पोकळे, सुरेखा धनिष्ठे, गणेश नलावडे, किशोर कांबळे, विक्रम जाधव व आदी हे उपस्थित होते.

अजित पवारांच्या बैठकीला पुण्यातून कोण उपस्थित होतं?

बांद्रा येथील एमईटी नॉलेज सिटी येथे अजित पवार यांच्या गटाची बैठक झाली. त्यामध्ये आमदार सुनील टिंगरे, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, महेंद्र पठारे, राजलक्ष्मी भोसले, प्रमोद निम्हण, आनंद आलकुंटे, दत्ता धनकवडे, बाळासाहेब बोडके, विनोद आरसे, अनिस सुंडके, प्रशांत म्हस्के, शंकर केमसे, सदानंद शेट्टी, विकास दांगट, रोहिणी चिमटे, दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, सुनीता मोरे, बाबा धुमाळ, विजय डाकले, भीमराव गलांडे, गणेश घुले यांच्यासह आदी उपस्थित होते.

NCP Crisis
Bachchu Kadu On Political Crisis: अजितदादांना सरकारमध्ये घेतल्याने बच्चू कडू नाराज? म्हणाले, आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं..

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम...

पुण्यात शरद पवार, अजित पवार यांच्याशी घरगुती संबंध असलेले अनेक पदाधिकारी आहेत. त्यामुळे नेमकी कोणासोबत जायचे यावरून त्यांच्या मनात संभ्रम कायम आहे. अशा नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा तटस्थ असलेला तिसरा गट पुण्यात पाहायला मिळत आहे. तसेच काही माजी नगरसेवकांनी दोन्ही बैठकांना उपस्थिती लावत चलाखी केल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे कोणीच नगरसेवक नाही, त्यामुळे त्याचा व्हीप लागू होत नसल्याचे अनेकांच्या पथ्यावर पडले आहे. या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षात अशी फूट पडलेली असताना आम्ही नगरसेवक नाही याचाच आनंद आम्हाला आहे, अन्यथा कोणती तरी एक भूमिका घ्यावी लागली असती. भविष्यात काय होते निवडणुका कधी होतात, तेव्हा उघड भूमिका घेऊ, असे एका माजी नगरसेवकाने सांगितले आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com