Jyoti Malhotra: You Tuber ज्योतीकडून मुंबईची रेकी; 'लालबागचा राजा'सह महत्वाच्या ठिकाणांचे Video काढले...

Youtuber Jyoti Mumbai Surveillance: ज्योतीनं हे व्हिडिओ अन् फोटोचा वापर कशासाठी केला, फोटो-व्हिडिओ कुणाला दिले आहेत? याचा तपास मुंबई पोलिस करणार आहेत. जुलै 2024 मध्ये ज्योती ही एका खासगी बसने मुंबईत पोहचली होती. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये कर्नावती एक्सप्रेसने ती अहमदाबाद येथून मुंबईला आली होती.
YouTuber Jyoti Malhotra News update
YouTuber Jyoti Malhotra News updateSarkarnama
Published on
Updated on

Youtuber Secret Filming Mumbai: यूट्युबर ज्योती मल्होत्राचे कारनामे दररोज बाहेर येत आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील एका अधिकार्‍यासोबत संबंध असल्याचे आता तपासादरम्यान उघडकीस येत आहे. त्यानंतर दररोज नवीन माहिती समोर येत आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी अटक केली आहे. तपास यंत्रणा तिची चौकशी करीत आहे. अशातच तिचं मुंबईसोबत असलेले कनेक्शन समोर येत आहे.

याबाबत एनआयए आणि अन्य तपास यंत्रणेसह मुंबई पोलिस ज्योति मल्होत्राची चौकशी करणार आहे. 2023 आणि 2024 मध्ये अनेक वेळा ज्योति ही मुंबईला येऊन गेली असल्याचे तपासात आढळले आहे. आपल्या मुंबई दौऱ्याच तिनं लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. या दौऱ्यात तिनं मुंबईतील अनेक महत्वपूर्ण ठिकाणांची चित्रिकरण केले होते, फोटो काढले होते.

ज्योतीनं हे व्हिडिओ अन् फोटोचा वापर कशासाठी केला, फोटो-व्हिडिओ कुणाला दिले आहेत? याचा तपास मुंबई पोलिस करणार आहेत. जुलै 2024 मध्ये ज्योती ही एका खासगी बसने मुंबईत पोहचली होती.

त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये कर्नावती एक्सप्रेसने ती अहमदाबाद येथून मुंबईला आली होती. त्याच वर्षी ती सप्टेंबर महिन्यात दिल्लीहून मुंबईला आली होती. 2023मध्ये गणेशोत्सवा दरम्यान तीनं लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. लाखो गणेशभक्तांच्या गर्दीत तिनं परिसराचा व्हिडिओ काढला होता. या आधारे मुंबई पोलिस तिची चौकशी करणार आहेत.

YouTuber Jyoti Malhotra News update
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; रूपाली चाकणकर यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

आज तिची पोलीस कोठडी संपणार आहे. तिला पुन्हा हिसार न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलीस तिच्या वाढीव कोठडीची मागणी करणार की तिला तुरुंगात पाठवणार हे दुपारी समजेल. हेरगिरी प्रकरणात ज्योतिचं नाव आल्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ, पाकिस्तान मधील अधिकाऱ्यांशी असलेले संबध याबाबतचे वृत्त माध्यमांनी दिले आहे आहे. याबाबत हरियाणा पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ज्योती मल्होत्राबद्दल पसरणाऱ्या अनेक बातम्या निराधार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अशा बातम्यांचा तपासावर परिणाम होतो. त्याचा देशाच्या सुरक्षेवरही परिणाम होतो, असे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com