राज्य सरकारने चालवलाय युवकांच्या ‘करिअर’शी खेळ

अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या युवकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.
जगदीश मुळीक
जगदीश मुळीकसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : आरोग्य विभागाच्या आजच्या परीक्षेत पुणे आणि नाशिकमध्ये झालेला गोंधळ म्हणजे राज्य सरकारने युवकांच्या ‘करिअर’शी जाणीवपूर्वक चालू केलेला खेळ आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

पुण्यातल्या अबेदा इनामदार कॉलेजमध्ये होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे या केंद्रावरील उमेदवारांचे मोठे नुकसान होणार आहे. पुणे आणि नाशिक मधील केंद्रांवर हा अभूतपूर्व गोंधळ राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे झाला असून त्यामुळे परीक्षा देणाऱ्या युवकांना प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागले आहे.

जगदीश मुळीक
रवींद्र बऱ्हाटेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

या अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या युवकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे,अशी मागणी शहराध्यक्ष मुळीक यांनी केली आहे. या परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या कंपन्यांना देण्यात आलेले आहे त्या कंपन्या ‘ब्लॅक लिस्टेड’ असून राज्य सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मुळीक यांनी यावेळी केली.ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट कोणाच्या सांगण्यावरून आणि का देण्यात आले याचाही खुलासा ठाकरे सरकारने त्वरित करावा, अशी मागणी मुळीक यांनी केली आहे.

दिशाहीन राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचे प्रतिबिंब प्रत्येक सरकारी योजनेमध्ये दिसत आहे. विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये चाललेला सरकारी घोळ राज्यातील युवकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे.आरोग्य विभागातील विविध पदासाठी परीक्षेतील गोंधळाची परंपरा या परीक्षेतही कायम आहे. गेल्यावेळी परीक्षेतील प्रवेशपत्रातील गोंधळ, हॉल तिकीटांमध्ये चुका, परीक्षा केंद्राचा पत्ता नसणे, चुकीचे फोटो, दूर-दूर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र अशा गोंधळामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ, संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आयत्यावेळी परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. राज्यात नऊ लाखांपेक्षा अधिक युवकांनी परीक्षेला नोंदणी केलेली आहे.

जगदीश मुळीक
पिंपरीपाठोपाठ शरद पवार पुण्यातही लक्ष घालणार

अनेक उमेदवारांचा नंबर त्यांचा स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांमध्ये आलेला आहे. पुणे आणि इतर जिल्ह्यातील विद्यार्थी गोंदिया भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये तर तेथील उमेदवार पुणे मुंबई मध्ये असा सावळा गोंधळ राज्य सरकारने घातलेला आहे. तालुका स्तरावरही परीक्षाचे केंद्र देण्यात आले आहेत. तासनतास प्रवास करून पोहचलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या काहीतास आधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

खंडणी वसुली आणि हरबल तंबाखू चे समर्थन यामध्येच राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री व्यस्त आहेत.सर्वसामान्य जनतेच्या कोणत्याही मूलभूत प्रश्नाकडे अथवा गरजांकडे लक्ष देण्याची गरज ठाकरे सरकारला अजिबात वाटत नाही हे या राज्यातील जनतेचे मोठे दुर्दैव आहे,असेही मुळीक यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com