BJP News : भाजपच्या विधी सेलच्या राज्य प्रभारीपदी अॅड. धर्मेंद्र खांडरे यांची नियुक्ती

Pune News : आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
Dharmendra Khandre News
Dharmendra Khandre NewsSarkarnama

Dharmendra Khandre News : आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या विविध मोर्चा व प्रकोष्ठ (सेल) च्या प्रभारी व संयोजकांची नियुक्ती पाच सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. भाजपचे (BJP) विचार, केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विधी सेल, बुद्धिजीवी सेल, उद्योग, वैद्यकीय, सहकार, सांस्कृकिक, शिक्षण, आर्थिक, कामगार अशा विविध सेलचा सहभाग आहे.

Dharmendra Khandre News
Manoj Jarange Live : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगे-पाटलांचं ठरलं; उद्या सकाळी ११ वाजता घेणार निर्णय

यामध्ये भाजपने विधी सेलच्या प्रदेश प्रभारीपदी अॅड. धर्मेंद्र खांडरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या कार्याची दखल प्रदेश पातळीवर घेतली आहे. यापुर्वी त्यांनी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून प्रभावी काम केले आहे. तसेच शिरुर (Shirur) लोकसभा संयोजक म्हणून ते काम करत आहेत.

Dharmendra Khandre News
Congress News : 'भारत जोडो'चा वर्धापनदिन ; गुरुवारी पुन्हा यात्रा काढत, काँग्रेस मोदी सरकारची पोल खोलणार !

खांडरे हे राजगुरुनगर सह. बॅंक तज्ञ संचालक आहेत. बाबुराव दौंडकर स्मारक समिती अध्यक्ष आहेत. रांजणगाव गणपतीमध्ये ते संचालक आहेत. शिरुर ॲग्रोफेड, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com