Manoj Jarange Live : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगे-पाटलांचं ठरलं; उद्या सकाळी ११ वाजता घेणार निर्णय

Maratha Reservation Updade : निजामकालीन नोंदी नसणाऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political News : जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर बुधवारी राजकीय हलचालींनी वेग घेतल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासाठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांबाबत आजच आदेश काढण्यात येणार आहेत.

राज्य सरकारचा हा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि राजेश टोपे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांना दिला. यावर मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वंशावळ नाही, त्यांनाही आरक्षण दिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. आता ते काय निर्णय घेणार, याकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

Manoj Jarange
Eknath Shinde News : जरांगेंच्या आंदोलनाला यश ? मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; ...त्यांना 'कुणबी' दाखला मिळणार !

मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या मराठा समाजातील लोकांकडे निजामकालीन कुणबीच्या नोंदी आहेत, त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदीचे पुरावे आहेत, त्या सर्वांना यापुढे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले.

मराठा आरक्षणासाठी झालेल्या मंत्रिमंडळात दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला. आरक्षणासाठी आता आणखी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती निवृत्त न्यायाधीशांची असून यात पाच सदस्य असणार आहेत. ही समिती कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी लागणारे सर्व पुरावे, कागदपत्रांची तपासणी करणार आहे. तसेच आरक्षणासाठी पूर्वी स्थापन केलेली समिती या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीला मदत करणार आहे. (Maharashtra Political News)

Manoj Jarange
PCMC News : ''मराठा आरक्षण आंदोलनावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आमदार लांडगेंचे पुण्यात मशिदीविरोधात आंदोलन''

मंत्रिमंडळात घेतलेल्या या दोन निर्णयांवर आज रात्रीच जीआर काढणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. याची माहिती उपोषणकर्ते मनोज जरांगेंना माजी मंत्री खोतकर आणि टोपे यांनी दिली. 'सरकार चार पावले पुढे आले असून जरांगेंनीही सहकार्य करण्याच्या भावनेतून निर्णय घ्यावा', असे आवाहन खोतकरांनी केले. यावर मराठा 'समाजातील ज्या लोकांना कुणबीची वंशावळ दाखवता येणार नाही, त्यांनाही प्रमाणपत्र द्यावे', असे जरांगे यांनी सांगितले. तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणांवर गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय घेणार असल्याची माहिती दिली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com