Rahul Kalate News : कसबा, चिंचवड पोटनिवडणुका महाविकास आघाडीसह भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचंच असा ठाम निर्धार देखील केला आहे. मात्र, कसब्यात काँग्रेससमोर आणि चिंचवडमथ्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं बंडखोरीमुळे चांगलंच टेन्शन वाढवलं आहे. कसब्यात काँग्रेसच्या शिष्टाईला यश आलं असून बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. परंतू, चिंचवडमध्ये अजूनही महाविकास आघाडीत राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे चिंतेचं वातावरण आहे.
कसबा पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुद्त आज (दि.१०) दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राहुल कलाटें(Rahul Kalate) ची बंडखोरी रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. मात्र, अद्याप तरी त्यात यश आलेलं नाही.
राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी कलाटेंसोबत फोनवरुन चर्चा केली. तसेच खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी विनंतीची माघार घ्यावी म्हणून केलेली विनंती, राष्ट्रवादीच्या विलास लांडेंनी भेट घेऊन माघारीसाठी घातलेली गळ,संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी तातडीनं उध्दव ठाकरेंचा निरोप घेऊन तातडीनं चिंचवड गाठत कलाटेंशी केलेली चर्चेनंतर ते माघार घेतील अशी शक्यता होती.
पण यासर्व घडामोडीनंतरही कलाटे यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन कायम आहे.
आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी चिंचवड येथे राहुल कलाटे यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. तसेच त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संभाषणही करुन दिलं. मात्र, तरीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे आघाडीसमोरचं बंडखोरांचं आव्हान कमी झालेलं नाही.
कलाटेंशी चर्चा केल्यानंतर सचिन अहिर काय म्हणाले?
सचिन अहिर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अहिर म्हणाले,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. कलाटे यांनी निवडणुकीत माघार घ्यावी, भविष्यात महाविकास आघाडीकडून त्यांना राजकीय मदत केली जाईल. उद्धव ठाकरेंचा हा निरोप आम्ही त्यांना दिला. तसेच त्यांचं आज उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणं झालं आहे. ठाकरे यांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह ग्राह्य धरून त्यांनी या निवडणूक माघार घ्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. ॉ
अहिर यांच्याशी चर्चेनंतर राहुल कलाटे म्हणाले..
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर मला भेटले. त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची मला विनंती केली. मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नसून कार्यकत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहे. दुपारी तीनवाजेपर्यंत आमची भूमिका स्पष्ट करणार झालेली असेल असंही कलाटे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.