उद्धघाटनांपेक्षा विद्यार्थ्यांची सुटका महत्वाची ; पवारांचा मोदींना टोला

महत्त्वाच्या प्रकल्पांसोबत मुलांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं,'' असा टोमणा पवारांनी मोदींना लगावला.
sharad pawar,pm modi
sharad pawar,pm modisarkarnama
Published on
Updated on

पुणे : रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यावरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi)यांच्यावर टीका केली आहे. रविवारी मोदींच्या हस्ते पुण्यात मेट्रोचे उद्धघाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींना आपल्या खास शैलीतून टोमणा लगावला आहे.पवार माध्यमांशी बोलत होते.

'मला हे मान्य आहे की, काही महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत. त्याच्या उद्घाटनाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. हे महत्त्वाचं आहे पण या महत्त्वाच्या प्रकल्पांसोबत मुलांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं,'' असा टोमणा पवारांनी मोदींना लगावला.

'' रशिया व युक्रेन युध्दाच्या संकटात कुणी काय केले किंवा काय केले नाही. याची चर्चा करण्याची, राजकारण करण्याची ही वेळ नाही. या मुलांना संकटातून कसे वाचवता येईल याकडे सत्ताधारी घटकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं,'' असेही पवार म्हणाले. ''सत्ताधारी अर्थात ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी यात अधिक लक्ष द्यावं,'' असे पवार म्हणाले.

sharad pawar,pm modi
राणे अन् मलिकांना वेगळा न्याय का ? शरद पवारांचा भाजपला सवाल

''युक्रेन-रशिया संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही दुष्परिणाम होऊ शकतो असे सांगतानाच देशाचे कृषी खाते सांभाळल्याने खाद्यतेलाची आपली स्थिती माहीत आहे. सुर्यफुल हे महत्त्वाचे खाद्य तेलाचे पिक असून युक्रेनमध्ये सर्वात जास्त सुर्यफुलाची शेती होते त्यामुळे सुर्यफूल तेलाची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अधिक लक्ष द्यावे,'' असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

''युनोमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे युक्रेनचे नागरीक भारतीय मुलांवर नाराज आहेत. युक्रेनचे स्थानिक नागरिक भारताच्या भूमिकेचे खापर विद्यार्थ्यांवर फोडत आहेत. त्यामुळे मुलांना यातना सहन कराव्या लागल्या,'' असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.

''लिबियातून हजारो माणसे याआधी भारताने आणली होती. सामान्य माणसांना याची कल्पना देखील नाही. युक्रेन आणि रशियाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परत आणण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. टीका-टीपण्णी आज करण्याची आवश्यकता नाही,'' असेही शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com