सातत्याने लोकसंपर्कात राहणारे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळांची अशीही नोंद !

जास्तीत जास्त नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न आजवर केला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ
महापौर मुरलीधर मोहोळसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदी विराजमान झाल्यापासून थेट लोकसंपर्काला अधिकाधिक प्राधान्य दिले असून त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. महापौर मोहोळ यांनी सलग दोन वर्षे महिन्याच्या चौथ्या शनिवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधला. महापौर जनसंवाद या नावाने होणाऱ्या या ‘फेसबुक लाईव्ह’ने आता २४ भागांचा टप्पा ओलांडला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ
अमित शहांच्या मतदारसंघात आता 'कलम ३७०'

भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे दुसरे महापौर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर महापौर मोहोळ यांनी नागरिकांशी दुहेरी संवाद व्हावा, यासाठी ‘फेसबुक लाईव्ह’ हा युवा वर्गाला साद घालणारा उपक्रम निवडला होता. यात सातत्य राखत याचे २४ भाग पूर्ण झाले. विशेष म्हणजे कोरोना काळात या ‘फेसबुक लाईव्ह’ने महत्त्वाची भूमिका निभावली होती. संकटकाळात पुणेकरांना कोरोना संदर्भातील अधिकृत आणि अचूक माहिती देणे, शंकांचे निरसन करणे अशा विविध बाबींना यात महत्त्व दिले गेले.

याबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘थेट लोकसंवादासाठी फेसबुक लाईव्ह हे माध्यम माझ्यासाठी सुखद अनुभव देणारे आहे. पुणेकरांनी या उपक्रमाला आजवर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे पुणेकरांनी आपले प्रश्न, समस्या, कल्पना अगदी मोकळेपणाने या व्यासपीठावर मांडल्या. त्या सोडवण्यासाठी महापौर कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था उभी केली. ज्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या सुटतात, हा विश्वास मिळाला आणि प्रतिसाद वाढतच राहिला’.

महापौर मुरलीधर मोहोळ
संजय राऊत, गुलाबराव पाटलांनंतर नाना पटोले यांच्याकडे लग्नाचा धूमधडाका…

'एकाच वेळी शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे हे नक्कीच आव्हानात्मक होते. मात्र जास्तीत जास्त नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न आजवर केला आहे, जो पुढेही कायम राहील. सभा, मेळावे ही पारंपरिक राजकीय संवादाची प्रभावी माध्यमे आहेतच. मात्र याही पलीकडे आणि कमी कालावधीत अधिकाधिक आणि थेट संपर्क होण्यासाठी फेसबुक लाईव्ह माध्यम मला अधिकाधिक महत्त्वाचे वाटले. या फेसबुक लाईव्हवर येणाऱ्या नकारात्मक प्रश्नांनाही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न विचारणारा हा पुणेकर नागरीक आहे, या भावनेतून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला', असेही महापौर मोहोळ म्हणाले.

'फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत तर पोहोचता आलेच, शिवाय अनेक लोक नव्याने जोडले गेले. महापौर जनसंवादमध्ये असेही काही पुणेकर आहेत, जे पहिल्या संवादावेळी जोडले गेले ते आजही कायम टिकून आहे. हे यश सर्वाधिक समाधान देणारे आहे. पुणेकरांनी विचारलेले प्रश्न, समस्या यांच्याकडे कधीही नकारात्मकतेने पाहण्याची भूमिका घेतली नाही', असेही महापौर मोहोळ म्हणाले.

'महापौर जनसंवाद' कोरोनाच्या काळात सर्वाधिक ठरला लोकप्रिय !

कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात महापौर मोहोळ यांचा महापौर जनसंवाद कमालीचा लोकप्रिय ठरला. या काळात नागरिकांचा सहभाग, प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या याचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले. शिवाय महापौर जनसंवादच्या व्यतिरिक्तही महापौर मोहोळ यांनी फेसबुकच्या माध्यमातून पुणेकरांना माहिती पुरवत संवाद साधला. यालाही मिळालेला प्रतिसाद मोठा होता.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com