Delhi Government News : ईडीने आज (गुरुवारी) दिल्लीत केजरीवाल सरकारमधील समाज कल्याणमंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी छापेमारी केली. त्यांच्याशी संबंधित नऊ ठिकाणी ईडीने छापेमारी केल्याची माहिती आहे.
ही चौकशी कशासाठी केली जात आहे, हे ईडीनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीनं समन्स बजावले आहे. त्यांची आज चौकशी होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केजरीवाल यांची चौकशी आज होत असतानाच दुसरीकडे त्यांचे मंत्री राजकुमार आनंद यांचीही चौकशी होत असल्याचे दिल्लीतील राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. मोदी सरकारच्या निशाण्यावर आपचे नेते असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना ज्याप्रमाणे तपास यंत्रणांनी अटक केली तशीच अटक आपल्याला होऊ शकते, अशी शंका केजरीवाल यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. सीबीआयने यापूर्वी केजरीवाल यांची चौकशी केली आहे. मद्यविक्री गैरव्यवहारप्रकरणी आपच्या अनेक नेत्यांना यापूर्वी अटक केली आहे.
केजरीवाल सरकारमधील मंत्री असलेले राजकुमार आनंद हे दलित समाजाचे नेते आहेत. दिल्लीच्या पटेलनगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांच्याकडे दिल्ली सरकारच्या सात विभागाची जबाबदारी आहे.
मनीष सिसोदिया हे जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर सिसोदिया यांच्याकडे १८ विभाग होते. त्यांच्याकडील विभाग राजकुमार आनंद आणि कैलाश गहलोत यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे.
राजकुमार आनंद यांची पत्नी वीणा आनंद या २०१३ मध्ये आपच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.