चंदीगड : पंजाबमध्ये (Punjab) सध्या मोठे राजकीय वादळ उठले आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt Amarinder Singh) यांच्या सरकारी निवासस्थानी जवळपास साडेचार वर्षे त्यांची एक पाकिस्तानी मैत्रीण राहत होती. ही महिला तिथे का राहत होती. याचे काही आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
अरुसा आलम असे या महिलेचे नाव आहे. ती संरक्षणविषयक पत्रकार असल्याने सांगण्यात येत आहे. या महिलेशी कॅप्टन याचे खास संबंध होते. पंजाबच्या राजकीय तसेच सांस्कृतिक वर्तुळातील सर्वांना हे माहित आहे. पंजाबला आयएसआयपासून धोका आहे. असे अमरिंदर सिंग का सांगत आहेत. त्या माहिती कोण देत आहे. हे आपण तपासत आहोत. चौकशीचा ससेमिरा आपल्या पाठी लागू नये, त्यामुळेच कॅप्टन भाजपला मदत करत आहेत, असे पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, कॅप्टन यांच्या पक्षस्थापनेच्या हालचालींना पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी अकाली दलाचे विविध गटांना सोबत घेण्यासाठी पावले उचलली आहेत. असे असले तरी सर्वच राजकीय पक्ष याबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत. शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) नेते सुखदेव धिंडसा आणि त्यांचे पुत्र परमिंदर धिंडसा यांनी अद्याप कॅप्टन यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे म्हटले आहे. परंतु, कॅप्टन यांनी अधिकृतरीत्या काँग्रेस सोडावी, अशी अटही त्यांनी घातली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.