Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या गटनेता निवड ठरावावर 3 आमदारांच्या सह्याच नाहीत; रामराजेंनी सांगितलं सही न करण्याचे कारण

Sunetra Pawar DCM : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी गटनेतेपदाच्या ठरावावर तीन आमदारांच्या सह्या नसल्याचे समोर आले असून, रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित नसल्यामुळे सही न केल्याचे स्पष्ट केले.
NCP legislators during the legislative party meeting in Mumbai where Sunetra Pawar was unanimously elected group leader, while signatures of three MLAs were missing on the resolution.
NCP legislators during the legislative party meeting in Mumbai where Sunetra Pawar was unanimously elected group leader, while signatures of three MLAs were missing on the resolution.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक शनिवारी दुपारी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी एकमताने निवड केली. यावेळी जो ठराव करण्यात आला त्या ठरावावर 3 आमदारांच्या मात्र स्वाक्षऱ्या नसल्याच पाहायला मिळालं.

माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ गटनेतेपदी निवडले. या निवडीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे. त्यानंतर शनिवारी (ता.31) सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेल्या पत्रावर एकूण 48 आमदारांच्या नावं आहेत. त्यातील 45 आमदारांच्या सह्या पहायला मिळत आहेत. त्यामध्ये 3 आमदारांच्या सह्या नसल्याचे समोर आले आहे. यात अहेरीचे आमदार धर्मरावबाबा अत्राम, शहापूरचे दौलत दरोडा आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सही दिसत नाहीत.

NCP legislators during the legislative party meeting in Mumbai where Sunetra Pawar was unanimously elected group leader, while signatures of three MLAs were missing on the resolution.
DCM Sunetra Pawar: सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; लोकभवानात साध्या पद्धतीनं पार पडला शपथविधी

याबाबत रामराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपली पत्रावर सही नाही म्हणजे आपला विरोध आहे असं नाही. आपण त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो त्यामुळे आपली सही नसल्याचं यावेळी रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केला आहे. तर दौलत दरोडा यांच्या पुतण्याचे निधन झाले आहे. त्यामुळे ते उपस्थित नसल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com