Sunetra Pawar Video : अजितदादांच्या विमान अपघात अहवालावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, 'तो संपूर्ण...'

Sunetra Pawar On Ajit Pawar Plane Incident Report : अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अपघाताविषयी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सविस्तर अहवाल आल्यानंतर यावर बोलू असे म्हटले आहे.
 Ajit Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये निधन झाले. विमान अपघाताविषयी वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी देखील या अहवालाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तो सोमवारी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. दरम्यान, या अहवालाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच वक्तव्य केले आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांनी अजितदादांच्या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचे अनेक एजन्सी मार्फत चौकशी सुरू आहे. आता प्राथमिक अहवाल आला आहे. तो संपूर्ण अहवाल नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळे अहवाल आल्यानंतर आपण याच्यावर बोलू शकतो.'

 Ajit Pawar, Sunetra Pawar
Mulshi Politics : आमदार मांडेकरांनी थोपटेंचा गेम पलटवला ! पंचायत समितीमध्ये अनोखा 'मुळशी पॅटर्न', सभापती फिक्स…

दरम्यान, पार्थ पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होत आहे. त्यांना कोणता सल्ला द्याल असे विचारले असता त्या म्हणाल्या, राज्यसभा उच्च आणि अतिशय अनुभवी लोकांचा सभागृह आहे. तिथे जाताना आपण सगळ्याच गोष्टी जाणकार म्हणून शिकून घेणं महत्त्वाचं आहे. इथून पुढे तो चांगली कामगिरी करेल असं मला आई म्हणून वाटतं.

 Ajit Pawar, Sunetra Pawar
President protocol : बंगालमध्ये निवडणुकीआधीच मोठा वाद; ममता बॅनर्जींकडून राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन, PM मोदींची नाराजी, तर फडणवीसांनी व्यक्त केला संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com