Sunetra Pawar Video : सुनेत्रा पवार तातडीने मुंबईला रवाना, अमित शाहांची घेणार भेट, राज्यसभेची रणनीती ठरणार?

Sunetra Pawar Rajya Sabha Election Amit Shah : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या नियोजित दौरा सोडून तातडीने मुंबईला रवाना झाल्या. गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुण्यात होणाऱ्या या बैठकीला उपस्थित न राहता सुनेत्रा पवार या तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

देशाचे गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला पवार या देखील उपस्थित राहणार असल्याने त्या मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्यसभेची निवडणूक अवघ्या 15 दिवसांनी होणार आहे. पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारांची नावे निश्चित करणयात येत आहेत. त्यामुळे या निवडणुकीसंदर्भात सुनेत्रा पवार आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sunetra Pawar
Beed Mahadev Munde murder case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात स्फोटक ट्विस्ट? परळी हादरवणारी मोठी नावे समोर येणार; मनोज जरांगेंच्या सूचक विधानानं खळबळ (Video)

राष्ट्रवादीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज पार पडली. सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीमध्ये ही बैठक झाली. बैठकीला आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, मंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच अंतिम निर्णय सुनेत्रा पवार या घेतील असे सांगण्यात आले.

Sunetra Pawar
hate speech : फक्त नितेश राणेंनाच नाही तर पडळकर, जगतापांही 'ती' वक्तव्य भोवणार? अ‍ॅड. असीम सरोदे न्यायालयात जाणार, नेमकं प्रकरण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com