Maval Lok Sabha : शेळकेंनी पुन्हा वाढवलं बारणेंचं टेन्शन; म्हणाले, 'राष्ट्रवादीचा उमेदवार दीड लाखांच्या...'

Sunil Shelke Vs Shrirang Barne : राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे बारणेंनी कमळावर लढावे, असा आग्रह भाजपकडून सुरू झाला आहे.
Sunil Shelke, Shrirang Barne
Sunil Shelke, Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

उत्तम कुटे

Pune Political News : शिरुर लोकसभेतील आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांचा पराभव करणार असे चॅलेंज महायुतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी दिल्याने त्यांच्या मनातील तो उमेदवार कोण याची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगलेली आहे. त्यातच अजितदादांचे मावळातील शिलेदार आमदार सुनील शेळकेंनी सुद्धा मावळातून खासदार श्रीरंग बारणेंना वारंवार विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, शनिवारी तर त्यांनी मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीने मावळचाच उमेदवार दिला, तर तो दीड लाखाच्या लीडने निवडून येईल असा दावा केला आहे. त्यामुळे मावळासाठी आमदार शेळकेंच्या मनातील उमेदवार कोण, याचीच चर्चा आता सुरू झालेली आहे. (Maval Lok Sabha)

Sunil Shelke, Shrirang Barne
Pune Politics : फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा ! भानगिरेंचा कोणाला सूचक इशारा

शेळके हे गेल्या चार महिन्यांपासून मावळ पक्षाने लढवावा, अशी मागणी करीत आहेत. त्यानंतर ती भाजपकडून सुरू झाली. परिणामी महायुतीकडून आपली उमेदवारी स्वत:च तेथे जाहीर केलेले बारणे यांचे टेन्शन काय कमी होण्याचे नाव घेत नाही. भाजपच्या मावळ कोअर कमिटीने, तर त्यासाठी दोनवेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेली शिरुरची जागा यावेळी अजित पवारांनी प्रतिष्ठेची केल्याने ती त्यांना शिवसेना सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळचा क्लेम राष्ट्रवादी सोडेल, अशी शक्यता होती. त्यातून बारणेंना दिलासा मिळणार होता. त्यातच शेळकेंच्या दाव्याने आणि आग्रहामुळे पुन्हा बारणेंची धडधड वाढली आहे.

Sunil Shelke, Shrirang Barne
Abhimanyu Pawar : अभिमन्यू पवार घाईघाईत बसवराज पाटलांच्या भेटीला गेले; खरं कारण आलं समोर

आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांची भूमिपूजने आणि उदघाटने करताना शेळकेंनी शनिवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. पक्षाने मावळ लढवावा हा आग्रह कायम ठेवताना त्यांनी उमेदवार हा मावळ तालुक्यातीलच देण्याची आग्रही मागणीही केली. तो आमचा अधिकार आहे, असे सांगत उमेदवारी जाहीर होईल तोपर्यंत तो कायम राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या लीडने निव़डून येईल, असा उमेदवार मावळात आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे तो कोण, ही चर्चा आता मावळात रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे बारणेंनी कमळावर लढावे, असा आग्रह भाजपकडून सुरू झाला आहे. यावर शेळकेंनी भाजपकडे माणसं नाहीत का, अशी विचारणा केली. त्याचवेळी त्यांनी अशी मागणी भाजपने केल्याचे ऐकितात नाही, असेही स्पष्ट केले. त्यांच्याकडून लढण्यासाठी इच्छुक असताना ते आयात उमेदवार देणार असतील आणि मतदारांनीही ते स्वीकारले, तर त्याचे आत्मपरिक्षण केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मावळ तालुक्यातील भाजपचा उमेदवार चालेल का, यावर शेळके म्हणाले, माझ्याकडे माझ्या तालुक्यात दीड लाखाने निवडून येणारा मजबूत उमेदवार असल्यानेच उमेदवारी मागतो आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीतील शिवसेनेचे खासदार बारणे आणि भाजपचे इच्छुक आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या उमेदवारीलाही विरोधच केला.

(Edited by Sunil Dhumal)

Sunil Shelke, Shrirang Barne
BJP Lok Sabha Candidate First List : 'मिशन 45'चा दावा, पण भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थानच नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com