Sunil Tingre Video : 'शरद पवारांना नाही पण यांना मी नोटीस दिली...' सुनील टिंगरे यांचा खुलासा

MLA Sunil Tingre reaction about this : सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवल्या असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता आमदार सुनील टिंगरे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Tingre
Sunil TingreSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेदरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवल्या असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता आमदार सुनील टिंगरे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वडगाव शेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी स्वतः नोटीस पाहिली नाही, मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे. जर तुम्ही पोर्शेकार अपघातामध्ये माझी बदनामी केली, तर तुम्हाला कोर्टात खेचू अशाप्रकारचा इशारा दिल्याची माहिती नोटिसमध्ये असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Sunil Tingre
Supriya Sule: अजितदादांना 'करारा जबाब' देत सुप्रियाताई म्हणाल्या, "भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार..."

स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात गेले होते, पवारसाहेब जर खरं बोलले तर त्यांना वकिलातून नोटीस पाठवणार आहे. तर सत्यमेव जयते, आम्ही तयार आहोत. ती नोटीस मी बघणार आहे, असंही खासदार सुळे यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता आमदार सुनील टिंगरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सुनील टिंगरे म्हणाले, काल वडगाव शेरी येथे झालेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मी शरद पवार यांना नोटीस दिले असल्याचे सांगितले. मात्र मी कोणत्याही प्रकारची नोटीस साहेबांना बजावली नसल्याचं स्पष्टीकरण सुनील टिंगरे यांनी दिले.

Sunil Tingre
Supriya Sule: अजितदादांना 'करारा जबाब' देत सुप्रियाताई म्हणाल्या, "भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार..."

सुनील टिंगरे पुढे म्हणाले, मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अनेक प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी एका प्रकरणामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्याबाबत काही वक्तव्य करण्यात आली त्यातून माझी बदनामी झाली यामाध्यमातून लोकांचे गैरसमज तयार करण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची चुकीची माहिती जाऊ नये यासाठी मी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना नोटीस देऊन चुकीच्या माहितीच्या आधारे कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करू नये याबाबतची नोटीस पक्षांना दिली आहे. मात्र वैयक्तिक अशी शरद पवार यांना कोणतीही नोटीस दिली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com