Sunil Tingre News : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंची पोलिसांनी केली चौकशी!

Pune Porsche Accident Case Update : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन कारचालकाने दोन तरुणांना उडवलं होतं, ज्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे या प्रकरणात हस्तक्षेपाबद्दल चर्चेत आले होते.
Sunil Tingre
Sunil TingreSarkarnama
Published on
Updated on

Sunil Tingre was interrogated by the Pune police : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात टिंगरे यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप आहे आणि आता टिंगरे यांची चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील, बाधंकाम व्यावसायिक अग्रवालची सुटका करण्यासाठी टिंगरे यांनी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन कारचालकाने दोन तरुणांना उडवलं होतं, ज्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे(Sunil Tingre) यांच्यावरही आरोप झाले होते. या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिका आहे का, यावरूनही चर्चा सुरू होत्या.

Sunil Tingre
Porsche Accident Update : कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणात अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट!

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार सुनील टिंगरे यांची तीन ते चार तास चौकशी केली आहे. मात्र या चौकशीत सुनील टिंगरे यांनी काय जबाब दिला आहे, हे समोर आलेले नाही. पुण्यातील येरवाडा तुरुंगात सुनिल टिंगरे काय करत होते? विशाल अग्रवालशी त्यांचा काय संबंध होता? असे अनेक प्रश्न आमदार टिंगरे यांना विचारले गेल्या असल्याची माहिती आहे. मात्र आता याबाबत टिंगरे यांनी काय जबाब नोंदवला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे यापुढे आता पुणे पोलिस या प्रकरणाचा कसा तपास करणार आहेत हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांची तीन ते चार तास चौकशी झाली, असल्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार(Ajit Pawar) यांनी सांगितले होते. मात्र या प्रकरणामध्ये टिंगरे यांचा दुरान्वये संबध नसल्याचेही चौकशीत समोर आल्याचेही अजित पवार म्हणाले होते.

Sunil Tingre
Pune Porsche Accident : सुनील टिंगरे पोलिस ठाण्यात कशासाठी गेले? याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे !

अजितदादांनी आमदार टिंगरे यांची पोर्श कार अपघात प्रकरणात चौकशी झाल्याचे सांगितले. तीन-चार तास टिंगरे यांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये जे काही घडले ते सुनीलने स्पष्ट सांगितले. यात टिंगरे यांचा दुरान्वये देखील संबंध नव्हता.

मात्र कारण नसताना काही जणांनी त्यांचे नाव यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मतदारसंघात काही प्रकार घडला असेल तर तिथल्या आमदाराला रात्री जाणे भाग आहे. आधार देणे हे त्याचे कर्तव्य आहे. घटनास्थळी काय घडले आमदाराला पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावरच कळणार ना, अगोदर काय त्याला काय स्वप्न पडणार का? असेही अजित पवार म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com