Pune Porsche Accident : सुनील टिंगरे पोलिस ठाण्यात कशासाठी गेले? याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे !

Porsche Hit And Run Case : दानवे यांनी या निमित्ताने काही प्रश्न उपस्थितीत करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आमदार सुनील टिंगरे सांगतात की मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे, असे म्हणत मग याचे उत्तर द्या, असे आव्हानच ..
Ajit Pawar- Sunil Tingre
Ajit Pawar- Sunil TingreSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar news : पुण्यातील कल्याणीनगर येथे मद्यधुंद अवस्थेत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या गाडीने दुचाकीला धडक देत युवक- युवतीला चिरडले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला जबाबदार धरत बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. ही अटक होण्याआधी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरेंचा हस्तक्षेप आणि तपासातील बनवाबनवी यामुळे जोरदार आरोप -प्रत्यारोप होत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले.

यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री पोलिस ठाण्यात कशासाठी गेले होते? असा सवाल करत काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. एवढेच नाही तर या प्रश्नांची उत्तरं खरतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावीत, असे म्हणत या वादात उपमुख्यमंत्री पवार यांनाही ओढले आहे.पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या हीट अॅन्ड रन प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar- Sunil Tingre
Vishal Agarwal News : विशाल अगरवाल यांनी जेवण मागितलं अन् तासाभरात बेड्या पडल्या; सिनेमास्टाइल घडली घटना...

अंबादास दानवे यांनी या निमित्ताने काही प्रश्न उपस्थितीत करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आमदार सुनील टिंगरे सांगतात की मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे ! असे म्हणत मग याचे उत्तर द्या, असे आव्हानच दानवे यांनी दिले. गेले का होतात, तुम्ही पोलिस (Police) ठाण्यात मध्यरात्री? एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोहचला आहात?

प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते अनेकदा अशा वेळी. यासाठी थेट ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेले होते ?, अशी प्रश्नांची सरबत्ती करतानाच दानवे यांनी याची उत्तरे आता खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच द्यायला हवीत, असे म्हणत त्यांना या वादात ओढले. अप्रत्यक्षपणे सत्ताधारी मंत्र्यांचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होता, असेच दानवे यांना सुचवायचे आहे असे दिसते.

Ajit Pawar- Sunil Tingre
Ajay Bhosle ON Surendra Agarwal: अजय भोसले वाचले, पण मित्राच्या छातीत गोळी शिरली! तेव्हा नेमकं काय घडलं?

याच प्रकरणात मंगळवारी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून अगरवाल याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. एकूणच पुणे हिट अॅन्ड रन प्रकरणानने विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी ते सोडताना दिसत नाहीयेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Ajit Pawar- Sunil Tingre
Pune Porsche Accident News : दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलानं दोन तासात पबमध्ये उडवली 'एवढी' रक्कम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com