Supriya Sule On BJP : पुण्यात येताच सुप्रिया सुळे कडाडल्या; म्हणाल्या, '... तर भाजपने माफी मागावी'

BJP Politics : 'भ्रष्टाचाराबाबत भाजपची भूमिका दुटप्पी'
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचा समाचार घेतला. तर नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोले लगावले. महिला आरक्षणाला पाठिंबा देताना काही मुद्द्यांकडेही मोदी सरकारचे लक्ष वेधले. दरम्यान, मोठा गाजावाजा करुन भरवलेले पाच दिवसांचे अधिवेशन चार दिवसांतच गुंडाळले. यानंतर पुण्यात परतलेल्या सुळेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. (Latest Political News)

अधिवेशनात सुळेंनी मोदी सरकारला राष्ट्रवादीवर केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे खुले आव्हान केले होते. यावरून सुळेंनी थेट अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य केल्याचे मानले जात आहे. यानंतर पुण्यातही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपचा समाचार घेतला. सुळे म्हणाल्या, 'मी वैयक्तिक कुणावरच बोललेली नाही. भाजप सातत्याने विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. मात्र भाजपमध्ये गेले की ते आरोप थांबतात. त्यामुळे केलेले आरोप खोटे असतात का? आरोप खोटे असतील तर त्यांनी माफी मागावी; अन्यथा केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी,' असे सुळे म्हणाल्या.

Supriya Sule
Dharashiv Shivsena News : धाराशिवमध्ये ताकद टिकवण्यासाठी ठाकरेंची कसरत; जिल्हाप्रमुखपदासाठी 'हे' आहेत प्रबळ दावेदार!

'एकीकडे भाजप आम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घातल नाही, असे म्हणते. तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना त्यांच्यासोबत घेते. भाजपने अशी दुटप्पी भूमिका सतात्यने घेतलेली आहे. त्याचा जाहीर निषेध करते,' असे म्हणत सुप्रिया सुळेंनी संतापही व्यक्त केला. 'मोदींनी केलेल्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर आमच्यावर जे आरोप केले त्याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. मी वैयक्तिक कुणावरही टीका केली नाही,' असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

नातेवाईकांची विनाकारण चौकशी केल्याचा आरोपही सुळेंनी केला. त्या म्हणाल्या, 'भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा सतत गैरवापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही भाजपवर टीका करतो म्हणून नातेवाईकांवरही धाडी टाकल्या गेल्या. ज्यांच्या कुटुंबावर अशा प्रकारे धाडी पडतात, त्यावेळी त्या कुटुंबियांवर काय परिणाम होतो, याचा कुणी विचार केला आहे का? विरोधाकांना घेरण्यासाठीच असे प्रकार केले जातात. भाजपने केंद्रीय यंत्रणांचा पार खेळखंडोबा केला आहे,' अशी खंत व्यक्त करून 'यंत्रणाचा गैरवापर थांबला पाहिजे,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Supriya Sule
Ravindra Tonge News : घरी सहा महिन्यांचं बाळ, तरी 'ओबीसीं'साठी लावली जिवाची बाजी; कोण आहेत रवींद्र टोंगे ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com