Dharashiv Political News : गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कळंब तालुक्याला युवा सेनेचे (शिवसेना ठाकरे गट) जिल्हाध्यक्षपद मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू, शिवसेनेचे माजी धाराशिव जिल्हाप्रमुख कै. नरसिंग जाधव यांचे पुत्र विश्वजित जाधव यांच्यासह युवासेना तालुकाप्रमुख मनोहर धोंडगे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. (Latest Political News)
शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची बाजू घेत आपले अस्तित्व निर्माण केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांत काही बदल केले आहेत. यातून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना जिल्हाप्रमुखपदी संधी देण्यासाठी चाचपणीही सुरू करण्यात आलेली आहे. हे पद कळंब, भूम, परंडा, वाशी तालुक्यांसाठी असून, येत्या काही दिवसांत या निवडी जाहीर होण्याची शक्यता आहे.
युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी कळंब तालुक्यातीळ युवा कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. विश्वजित जाधव, युवा सेनेचे तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे हे प्रमुख दावेदार आहेत. मनोहर धोंगडे हे सर्वांना घेऊन जाणारे युवा नेते म्हणून ओळखले जातात. विश्वजित जाधव यांचाही शहरासह ग्रामीण भागात मोठा संपर्क आहे. कळंब -धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे शिवसेना अध्यक्ष सचिन काळे हेही स्पर्धेत आहेत.
कळंब तालुक्यातील डिकसळ या मोठ्या ग्रामपंचायतीचे ते उपसरपंच राहिले आहेत. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर बाराते यांच्या नावाचीही चर्चा असून, ते माजी तालुकाप्रमुख आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या सर्वांचा सक्रिय सहभाग असतो.
एकंदरीतच चारही इच्छुक पदाधिकारी हे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar), आमदार कैलास पाटील व शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांचे निकटवर्तीय, समर्थक आहेत. युवा सेना जिल्हाप्रमुखाची निवड करताना वरिष्ठांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे धाराशिवच्या जिल्हाप्रमुखपदी ठाकरे गट कुणाला संधी देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.