Pune : ‘त्या’ दोघांमुळे लोकसभेतील 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता...

Intrusion in Lok Sabha : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची टीका
Supriya Sule on Lok Sabha Attack.
Supriya Sule on Lok Sabha Attack.Sarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule : संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. सध्याच्या सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

पुणे दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे म्हणाल्या, संसदेमध्ये ज्या दिवशी घुसखोरी झाली, त्या दिवशी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार तेथे उपस्थित होते. मात्र याबद्दल आता कोणीही प्रश्न विचारत नसून सगळ्यांना या हल्ल्याचा विसर पडला आहे का?

Supriya Sule on Lok Sabha Attack.
Ajit Pawar At Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती अन् भिडे वाड्याची पाहणी; अजितदादांचे खास फोटो!

सुळे पुढे म्हणाल्या, संसदेवर घुसखोरी झाली, त्या घुसखोरांकडे जर स्फोटके असती, जो तो धूर त्यांनी सोडला तो विषारी अला असता अथवा हा आत्मघातकी हल्ला असता तर 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता. या प्रकारानंतर अद्यापही केंद्र सरकार याबत गंभीर नाही, असेच दिसत आहे. संसद भवन देशातील सर्वांत महत्त्वाची इमारत आहे. या ठिकाणी पंतप्रधानांपासून देशातील सर्वांत महत्त्वाच्या पदांवर काम करणारे लोक असतात. या ठिकाणी अशा प्रकारची घुसघोरी होणे हे चिंताजनक आहे. त्यामुळे देशभरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नुकताच जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील जवानांवर हल्ला झाला. अशा प्रकारचे हल्ले होत असताना सरकार मात्र महागाई, बेरोजगारीबाबत लोकसभेत आवाज उठविणाऱ्या खासदारांचे निलंबन करत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दिल्लीत काही युवकांनी घुसखोरी केली होती. यातील दोन जणांनी लोकसभेतील गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या होत्या. त्यातील एकाने बुटातून धुराची नळकांडीही फोडली होती. खासदारांनी या घुसखोरांना पकडत सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संसदेच्या परिसरातही काही तरूणांनी याच वेळी निदर्शने केली. याप्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे. घुसखोरी करणाऱ्यांजवळ असलेले पुरावे त्यांच्या एका साथीदाराने नष्ट केले आहे. या घटनेनंतर संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे. घुसखोरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले आहे. जे सरकार संसदेची सुरक्षा करू शकत नाही, ते देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कशी सांभाळणार अशी चौफेर टीका सरकारवर होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Supriya Sule on Lok Sabha Attack.
Pune Police: धक्कादायक: पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com