Revati Sule Marriage: शरद पवारांच्या नातीचं लग्न ठरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीनं शेअर केले फोटो

Supriya Sule Daughter Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani:सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळे याचं लग्न ठरलं आहे. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाहसोहळा कधी आणि कुठे होणार याबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.
Supriya Sule Daughter Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani:
Supriya Sule Daughter Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani:Sarkarnama
Published on
Updated on

Revati Sule-Sarang Lakhani: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात लवकरच सनई-चौघड्याचे सूर ऐकायला मिळणार आहेत. शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे ही लवकरच लगीनगाठ बांधणार आहे.

सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळे याचं लग्न ठरलं आहे. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाहसोहळा कधी आणि कुठे होणार याबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या संदर्भातील माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे आणि सदानंद यांना रेवती आणि विजय अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात रेवती सुळे या राजकारणात सक्रिय नाहीत, मात्र गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली, त्यावेळी रेवती सुळे बारामतीत प्रचारात सहभागी झाल्या होत्या.

Supriya Sule Daughter Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani:
Vijay Shivtare News: शिंदेंच्या बड्या मोहऱ्याला गड राखण्यात अपयश; भाजपाचा नेम-शिवतारेंचा झाला गेम?

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई

  • सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.

  • सारंग हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

  • लखानी कुटुंब हे नागपूरचे आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com