Supriya Sule News : अजितदादांनी दिवाळीचं गिफ्ट काय दिलं ? सुळे म्हणाल्या...

Ajit Pawar News : राजकीय भूमिका वेगळी असली तरी कौटुंबिक पातळीवर मनभेद नाहीत.
Supriya Sule, Ajit Pawar News
Supriya Sule, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : राजकीय भूमिका वेगळी असली तरी कौटुंबिक पातळीवर मनभेद नाहीत, राजकीय मतभेद भाजपसोबतही आहेत. मात्र, भाजपातीलही अनेक कुटुंबाशी पाच दशकांहून अधिकचे ऋणानुबंध आहेत, कोणत्याच कुटुंबांशी आमचे मनभेद नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले.

बारामतीत रविवारी (ता. 12) माध्यमांशी बोलताना सुळे यांनी पवार कुटुंबाच्या एकत्रित दिवाळीबाबत बोलताना वरील प्रतिक्रीया दिली. जसजसे वय वाढते, तशी प्रगल्भताही वाढते, राजकीय भूमिका व कौटुंबिक नाती वेगळी आहेत, आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक अजिबात नाही या शब्दात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

Supriya Sule, Ajit Pawar News
Buldhana Stone Pelting: बुलढाण्यातील कोलोरी गावात दगडफेक; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

त्या म्हणाल्या, शरद पवार (Sharad Pawar) यांची काल तब्येत बरी नव्हती. मात्र, आज ते व्यवस्थित आहेत, जनतेचे प्रेम व आशिर्वाद हेच त्यांचे टॉनिक आहे. त्यांनी लोकांशी भेटी गाठी सुरू केल्या आहेत. अजितदादांशी काही बोलणे झाले का व दिवाळीच गिफ्ट काय दिले, असे विचारता त्या म्हणाल्या, आता ते मला कसे समजणार, ते तुम्हाला दादालाच विचारावे लागेल.

अजून तरी मला गिफ्ट मिळाल नाही. अजितदादा (Ajit Pawar) नुकतेच डेंगीच्या आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे ते कालही मास्क लावून कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला डॉक्टर त्यांना काय सल्ला देतात, त्यानुसार ते निर्णय घेतील, असेही सुळे यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Supriya Sule, Ajit Pawar News
Wankhede Meet Raut : समीर वानखेडे-संजय राऊतांची भेट विदर्भात शिवसेनेला नवा चेहरा मिळवून देणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com