Buldhana Stone Pelting: बुलढाण्यातील कोलोरी गावात दगडफेक; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Crime News: बुलढाणा जिल्ह्यातील कोलोरी गावात दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
Buldhana Stone Pelting
Buldhana Stone PeltingSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील कोलोरी गावात दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून या दगडफेकीच्या प्रकरणात 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा कोलोरी गावात दाखल झाला आहे.

सध्या कोलोरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर गावातील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. महापुरुषांचा फोटो असलेल्या पोस्टरवरून हा वाद निर्माण झाला, यानंतर दगडफेकीची घटना घडली. यावेळी काही गाड्यांवर देखील दगडफेक करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Buldhana Stone Pelting
Mangalvedha : ...म्हणून मंगळवेढ्यात निर्माण झाली मुंबईच्या राजकारणासारखी परिस्थिती!

यामध्ये पोलिसांच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. सध्या कोलोरीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तर या घटनेत 5 ते 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आरोपींना अटक करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील काही शहरात अशा पद्धतीने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभू नये, यासाठी पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. सध्या कोलोरी गावात पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Edited by : Ganesh Thombare

Buldhana Stone Pelting
Pune Crime News: पाच कोटी फसवणूक प्रकरण : पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाला मोठा दिलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com