Supriya Sule : नाराजांची मनधरणी करण्यात सुळेंचे प्रयत्न निष्फळ; हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशास तीन बड्या नेत्यांची दांडी

Harshvardhan Patil Join Sharad Pawar NCP : हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातील निष्ठावंत नेते नाराज झाले आहेत.
Harshvardhan Patil| Supriya Sule
Harshvardhan Patil| Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश केला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते नाराज झाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला नेते आणि पदाधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावली आहे. यात तीन बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापुरातील बाजार समितीच्या मैदानावर झालेल्या सभेत हर्षवर्धन पाटील यांनी 'तुतारी' हाती घेतली आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाला इंदापुरातील नेत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यात संभाव्य इंदापूर विधानसभेचे उमेदवार आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा, सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने यांचा समावेश आहे.

जगदाळे, माने आणि शह यांच्या विरोधानंतरही हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने आणि भरत शहा हे नाराज झाले आहेत. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला. मात्र, सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहे. त्यामुळे जगदाळे, प्रवीण माने आणि शहा कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com