Supriya Sule News : सुप्रिया सुळे भाऊबीजेला काटेवाडीत अजित पवारांच्या घरी जाणार

Pawar family's Bhaubeej : वेगळी राजकीय भूमिका घेणारे अजित पवार हे आज पाडव्याच्या कार्यक्रमापासूनही दूरच राहिले.
Ajit Pawar-Supriya Sule
Ajit Pawar-Supriya SuleSarkarnama

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर गोविंदबागेतील पहिल्याच दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (ता. १४ नोव्हेंबर) अनुपस्थित राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे नेहमीप्रमाणे राज्यातील नागरिकांना भेटले. मात्र, अजितदादांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहिले असले तरी खासदार सुप्रिया सुळे या मात्र उद्या काटेवाडीत होणाऱ्या भाऊबीजेला जाणार आहेत. या घरगुती कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Supriya Sule will go to Ajit Pawar's house in Katewadi for bhaubeej)

पवार कुटुंबीय हे दरवर्षी दिवाळी पाडव्याला राज्यातील नागरिकांना गोविंदबागेत भेटत असतात. आजपर्यंत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि गेल्या काही वर्षांपासून रोहित पवार हे लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत असत. यंदा प्रथमच गोविंदबागेत अजित पवारांविना दिवाळी पाडवा झाला. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत भाजप-शिवसेनेसोबत जात युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे वेगळी राजकीय भूमिका घेणारे अजित पवार हे आज पाडव्याच्या कार्यक्रमापासूनही दूरच राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar-Supriya Sule
ShahajiBapu Patil News : शहाजीबापूंनी पुन्हा दंड थोपटले; ‘मला २०२४ मध्ये कोणाचेही आव्हान नाही’

पाडव्यानंतर पवार कुटुंबीयांची भाऊबीज ही बारामती तालुक्यातील काटेवाडीत येथे अजित पवार यांच्या घरी असते. या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतात. अजित पवार यांनी आज दिवाळी पाडव्याला अनुपस्थित राहिले असले तरी खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपण काटेवाडीत भाऊबीजेला जाणार असल्याचे सांगितले आहे, त्यासाठी त्यांनी राजकीय भूमिका वेगळी आणि कौटुंबिक संबंध वेगळे असे अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यानुसार सुळे या उद्या काटेवाडीत भाऊबीजेला जाणार आहेत.

दरम्यान, भाऊबीजेला दरवर्षी पवार कुटुंबीय एकत्र येतात. पण आजारपणामुळे आपण दिवाळी पाडव्याला येऊ शकणार नाही, असे सांगणारे अजित पवार उद्या भाऊबीजेला उपस्थित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचबरोबर शरद पवार हेही या घरगुती कार्यक्रमाला उपस्थित राहतात की नाही, हेही पाहावे लागेल.

Ajit Pawar-Supriya Sule
SugarCane Price Issue : राजू शेट्टींच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा सतेज पाटलांनी सांगितला मार्ग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com