Supriya Sule on Aditi Tatkare : आदिती तटकरेंना सुप्रिया सुळेंकडून शुभेच्छा! म्हणाल्या 'ते' स्वप्न पूर्ण झाल्यास आनंद

Supriya Sule wishes Aditi Tatkare news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी आदिती तटकरेंना शुभेच्छा दिल्या असून त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यास आनंद होईल असे म्हटले आहे. जाणून घ्या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी.
Supriya Sule on Aditi Tatkare news
Supriya Sule on Aditi Tatkare newsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. आज त्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र त्यापूर्वी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी झालेल्या सभेमध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी सुनेत्र पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री बनवण्याचं कार्यकर्त्यांचं स्वप्न बोलून दाखवलं होतं. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असताना दुसरीकडे भविष्यातील राजकीय समीकरणांच्या चर्चांना देखील वेग आल्याचा पाहायला मिळत आहे. 2029 च्या निवडणुकीत जय पवार हे खासदारकीचे उमेदवार असणार का ? याबाबत एकीकडे चर्चा सुरू असल्याने पुन्हा एकदा 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात पाहायला मिळणार का अशा चर्चा सुरू आहेत.

Supriya Sule on Aditi Tatkare news
Sharad Pawar : शरद पवारांसाठी नातू पार्थ पवारांचे ट्विट, 'आजोबा, लवकर...'

तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या ऐतिहासिक मताधिक्य घेऊन विजयी होतील त्यामुळे त्यांच्या भविष्यातील मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीबाबत देखील चर्चा सुरू आहेत. यावर आता विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे.

काय म्हणाल्या होत्या आदिती तटकरे

आदित्य ठाकरे म्हणाल्या, आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं दादांनी मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा आणि स्वप्न होतं. अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला नाही हे दुर्दैव आहे. दादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले, त्या खुर्चीत दादांना आम्ही पाहत आलो आहोत. भविष्यात सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून दादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे.

याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आदिती तटकरे यांनी केलेले स्टेटमेंट मी पाहिलं असून त्यांचा जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं यासाठी आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहेत. दादांचं जे स्वप्न होतं ते सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री होऊन पूर्ण करावं असं अदिती तटकरे यांचं स्वप्न आहे. त्यामुळे जर सुनेत्रा वहिनी या मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला अभिमान कौतुक असेल आणि मनापासून त्याचा आनंद होईल असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

Supriya Sule on Aditi Tatkare news
NCP News: जत्रांतील अश्लील लावणीवर कारवाई? सेन्सॉरसाठी राष्ट्रवादीची फडणवीसांकडे धाव

तसं 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आम्ही नक्कीच सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहू असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांना 2029 मध्ये जय पवारांच्या उमेदवारी बाबत विचारला असता त्यांनी देशात लोकशाही असून कोणीही निवडणूक लढू शकतो आणि हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाब असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com