Video Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा पैसे वाटपाचा आरोप, मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, 'ज्यांना समोर पराभव दिसतोय...'

Sushma Andhare Shambhuraj Desai : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही कायदेशीरपणे पैसे वाटपाची तक्रार निवडणूक आयोगाला करणार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
Sushma Andhare Shambhuraj Desai
Sushma Andhare Shambhuraj Desai sarkarnama

Sushma Andhare News : नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघतील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचार्थ शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगाव येथील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. याच सभेनंतर पैसे वाटप करण्यात आल्याचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे घाटावरती गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ज्यांना समोर पराभव दिसतोय त्यांना पराभव झाल्यावरच कारण काय द्यायचे त्याच्यासाठी अगोदरच ग्राऊंड तयार करण्याचे काम सुरु आहे. अंधारे यांनी हे व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे तसेच पोलिसांकडे द्यावेत. ते त्याची चौकशी करतील. आमचं काही म्हणणं नाही, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

सुषमा अंधारे Sushma Andhare म्हणाल्या, महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारासाठी जळगावच्या आदित्य लॉनवर प्रचार सभा भरली होती. या सभेला शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण इतर कर्मचारी आणि संस्थाचालक उपस्थित होते. या सभेनंतर ज्या शाळांमधून सहा किंवा सहा पेक्षा जास्त जण सभेला आले होते. त्या शाळेच्या प्रमुखांना अथवा मुख्याध्यापकांना बोलून रीतसर पैसे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

Sushma Andhare Shambhuraj Desai
Vishal Patil : "फडणवीस सरकारनं जरांगेंना त्रास दिला अन् मी खासदार झालो", विशाल पाटील असं का म्हणाले?

आरोप हवेत करत नाही

हे आरोप हवेत करत नसून या बाबत पुरावा असलेला व्हिडिओ ट्विट केला आहे. जर विरोधकांकडून हा व्हिडिओ त्या ठिकाणचा नाही, असा जर दावा करण्यात आला तर मला सभेतील अन्य व्हिडिओ देखील दाखवावे लागतील. जे लोक पैसे घेत आहेत तेच लोक त्याच कपड्यांमध्ये सभेला उपस्थित असल्याचे स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये दिसून येईल.

निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार

या प्रकाराबाबत माझे रीतसर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणं झाले आहे. खासदार संजय राऊत Sanjay Raut आणि पक्षाचे सचिव असलेल्या अनिल देसाई यांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे. त्यांच्याकडून याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही कायदेशीरपणे याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Sushma Andhare Shambhuraj Desai
Radhakrishna Vikhe On Manoj Jarange : 'मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही'; भाजप नेते विखेंनी जरांगेंना फटकारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com