Pune Flood : पुण्यातील पुराचा पहिला दणका वरिष्ठ अधिकाऱ्यांना; थेट निलंबनाची कारवाई

Pune Rain Sandip Khalate Rajendra Bhosale : पुण्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीला आलेल्या पुरामुळे अनेक भागात हाहाकार उडाला होता.
Pune Flood, PMC
Pune Flood, PMCSarkarnama
Published on
Updated on

Pune : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे हाहाकार उडाला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री अजित पवारांनी तिथे जाऊन पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर या स्थितीचे खापर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फोडण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत.

Pune Flood, PMC
Sainath Babar: मोठी बातमी: मनसेचा पहिला उमेदवार ठरला! पुण्यात साईनाथ बाबर Vs वसंत मोरे?

आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, 25 जुलैला सिंहगड रोड येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता खलाटे यांनी केलेल्या कामामध्ये कर्तव्यपरायणता दिसून आलेली नाही. तसेच त्यांनी कामाची जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली नसून ही अशोभनीय गोष्ट केलेली आहे.

कर्तव्य पार पाडताना खलाटे यांनी गुणवत्ता, औचित्य व उत्तरदायित्व ठेवले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना मनपा सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. खलाटे यांच्याविरुध्द खातेनिहाय चौकशीची कार्यवाही करण्याची दक्षता उपायुक्तांनी ग्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune Flood, PMC
Dilip Mohite Patil Vs Shivsena : मोहिते पाटलांविरुद्ध शिवसेनेकडे तगडा चेहरा? राऊत 'खेड'चा वचपा काढणार, 'तो' शब्द खरा करणार?

दरम्यान, खडकवासला धरणातून अचानक रात्री पाणी सोडण्यात आल्याचा ठपका पालिका प्रशासनाने जलंसपदा विभागावर ठेवला आहे. तर पाणी सोडण्याबाबतची माहिती आधीच दिल्याचा दावा या विभागाने केला आहे. त्यामुळे या दोन यंत्रणांमध्येच वाद सुरू असून त्याचा पहिला बळी खलाटे ठरले आहेत, अशी चर्चा आता पालिका वर्तुळात सुरू आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील स्थिती अत्यंत भयानक होती. नागरिकांची प्रचंड झाले झाले. त्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश पवारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com