Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील 'तो' नराधम राष्ट्रवादी आमदाराचा कार्यकर्ता? विधानसभा प्रचारात सक्रिय

Swargate Rape Case Datta Gade: आरोपी त्याच्या व्हॉट्सअप डीपीवर अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर खटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी गाडे हा त्याच्या गावातील लोकांना उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या दर्शनाला घेऊन जायचा.
Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वारगेट येथील झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर सबंध महाराष्ट्र हादरून गेलं आहे. या प्रकरणानंतर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं मतं देखील अजित पवारांनी व्यक्त केले आहे. अशातच हा बलात्कार करणारा नराधम हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारचा कार्यकर्ता म्हणून मिरवत असल्याचं समोर आले आहे. यानंतर आमदारांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

स्वारगेट बस स्थानकावर मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. या नंतर या प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्तात्रेय गाडेचा पोलिस कसून शोध घेत आहेत. आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र त्याच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar
Madhi Kanifnath Yatra: मढी ग्रामपंचायतीची 'त्या' ठरावाने डोकेदुखी वाढवली; आता मंत्री नीतेश राणेंकडे धाव

या माहितीमुळे आरोपीचे राजकीय संबंध होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीने आपल्या व्हाट्सअप चा डीपी वर आमदारांचा फोटो ठेवला आहे. तसंच नुकत्याच आलाय विधानसभा निवडणुकीदरम्यान तो प्रचारात देखील सक्रिय असल्याचं बोललं जात आहे.

आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर खटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी गाडे हा त्याच्या गावातील लोकांना उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून तो गावात मिरवायचा असं सांगितलं जात आहे.

आरोपी आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जाऊ लागल्यानंतर आमदार कटके यांनी याबाबत खुलासा केला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी हा माझा कार्यकर्ता नसून माझा काही संबंध पाहिजे असे नाही. त्याने फोटो ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही, असे स्पष्टीकरण कटके यांनी याबाबत दिला आहे. दरम्यान प्राथमिक तपासानुसार , हा आरोपी राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. पोलिस या दृष्टिकोनातून चौकशी करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com