

Pune ZP News Result : पुणे जिल्हा परिषदेसाठी भोर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपचे संख्याबळ फिप्टी-फिप्टी झाले आहे. याशिवाय भोर पंचायत समितीच्या 8 पैकी 4 जागेवर भाजपचे तर 4 जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे शंकर मांडेकर व संग्राम थोपटे या आजी-माजी आमदारांमधील प्रतिष्ठेची लढत समसमान सुटली आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या वेळू-नसरापूर गटातून भाजपाचे पोपट सुके आणि उत्रौली-कारी गटातून भाजपाच्या स्वरूपा थोपटे विजयी झाल्या तर भोंगवली-कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड आणि भोलावडे-शिंद गटातून राष्ट्रवादीचे प्रवीण जगदाळे विजयी झाले. विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे आपापल्या कार्यक्षेत्रात फटाक्यांची आतिषबाजी करून वाद्यांच्या गजरात मिरवणूका काढल्या.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे यांनी 2007 मध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुमारे 2 हजार 800 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर आता 2026 मध्ये संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांनी रणजित शिवतरे यांचा तब्बल 5 हजार 644 मतांनी पराभव केला. अखेर पत्नीच्या पतीच्या पराभवाचा बदला घेतला असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
मागील जिल्हा परिषदेच्या सत्ता काळामध्ये रणजीत शिवतारे हे उपाध्यक्ष पदावर होते. त्यामुळे यंदा त्यांना दिवंगत अजित पवार यांनी निधनापूर्वी अध्यक्षपदाचा शब्द दिला होता असं सांगितलं जात होतं. पण आता थोपटेंनी त्यांचाच पराभव करून अध्यक्षपदाच्या दावेदाराला घरी बसवलं असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.