Sunil Shelke-Bala Bhegde : मावळच्या राजकारणात उलथापालथ : कट्टर विरोधक शेळके-भेगडेंची हातमिळवणी; मामा-भाचे मैदान मारणार?

Talegaon Lonavala Maval Civic Polls: लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे यांची नगराध्यक्षपदासाठी तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपचे संतोष दाभाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Talegaon Lonavala Maval civic polls
Talegaon Lonavala Maval civic pollsSarkarnama
Published on
Updated on

Talegaon News: एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप नेते बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके हे नगरपंचायत, नगरपरिषदा, जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहे. मंगळवारी दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत एकमेंकांना टाळी होती. आज या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मामा-भाचे एकत्र आल्याने तळेगावच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

मुंबईत झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुनील शेळके माजी राज्यमंत्रिपद बाळा भेगडे गणेश भेगडे,इंदर ओसवाल, संदीप गराडे उपस्थित होते. तळेगाव दाभाडे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी माहिती दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख सुरेश चौधरी आदी उपस्थित होते

तळेगाव शहराच्या विकासाला गती मिळावी, यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ही युती केल्याचे आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले आहे.

मावळ तालुक्यातील लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्टवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अखेर महायुतीचा फॉर्म्युला निश्चीत झाला आहे. लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष असे ठरले आहे.

Talegaon Lonavala Maval civic polls
PMC Election 2025: पुणे महापालिकेत दिसणार नाहीत दिग्गज चेहरे : दोन महापौरांसह सहा माजी नगरसेवक यंदा रिंगणाबाहेर

महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे आपले नऊ उमेदवार जाहीर केले. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ तर भाजपने कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचे ठरले असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शेळके यांनी माहिती देताना सांगीतले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर चर्चा होऊन ही युती करण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे यांची नगराध्यक्ष पदासाठी तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपचे संतोष दाभाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अडीच वर्षानंतर दोन्ही कडे नगराध्यक्ष बदलण्यात येतील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत एकूण 28 नगरसेवकांची संख्या असून त्यापैकी 17जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर11 जागा भाजपला असे ठरले असून लोणावळा नगरपरिषदेत लवकरच जागा वाटपांचे चित्र स्पष्ट होईल.

घड्याळ व कमळ चिन्ह् सोडून आमचा पाठींबा नाही

तळेगाव व लोणावळा नगरपरिषदेत युतीचे उमेदवार ज्यांच्याकडे घड्याळ आणि कमळ चिन्ह असेल त्याचाच प्रचार भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसधील पदाधिकारी करणार आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार जाहीर या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खाडगे यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार जाहीर केले.

प्रभाग 1 आशा अशोक भेगडे, प्रभाग 2 संदीप बाळासाहेब शेळके, प्रभाग 3 सिध्दार्थ गोरख दाभाडे, प्रभाग 4 गणेश मोहणराव काकडे, प्रभाग 5 भारती सुरेश धोत्रे, प्रभाग 7 सत्यम गणेश खांडगे, प्रभाग 9 हेमलता चंद्रभान खळदे, प्रभाग 10 संगीता सतीष खळदे, प्रभाग 12 संतोष छबुराव भेगडे असे 9 उमेदवार जाहीर केले असून अन्य उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी माहीत गणेश खांडगे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com