तब्बल १५ वर्षानंतर ‘यूपीएससी‘त फडकला पिंपरी-चिंचवडचा झेंडा

पिंपरी चिंचवडच्या तन्मयी देसाई हिने `यूपीएससी`त मिळवले यश
Tanmayi Desai
Tanmayi DesaiSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी UPSC) २०२१ च्या परीक्षेत पहिले तीनही क्रमांक पटाकवून मुलींनी बाजी मारली आहे. क्लास न लावता ऑनलाईन मार्गदर्शन घेत सेल्फ स्टडीद्वारे पिंपरी-चिंचवडमधील तन्मयी सुहास देसाई हिने सर्वात कठीण परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. देशातील ६८५ जणांच्या गुणवंतांच्या यादीत ती २२४ व्या स्थानी आहे. तिच्या यशामुळे तब्बल १५ वर्षांनंतर पिंपरी चिंचवडचा (Pimpri Chinchwad) झेंडा यूपीएससीत फडकला आहे, यापूर्वी २००७ मध्ये असे यश पिंपरी चिंचवडने अनुभवले होते. (Tanmayi Desai from Pimpri Chinchwad achieved success in UPSC)

दरम्यान,पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल तन्मयी हिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. निगडी प्राधिकरणातील तिच्या घरी त्यासाठी गर्दी होत आहे. स्थानिक माजी नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी तन्मयीच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले. शहरातील आमदार भोसरीचे महेश लांडगे यांनीही तिचे कौतूक केले आहे.

Tanmayi Desai
Sourav Ganguly : सौरव गांगुली खेळणार नवी इनिंग ; राजकारणात प्रवेश ?

तब्बल १५ वर्षानंतर तन्मयीने पिंपरी-चिंचवडकरांची मान उंचावणारी कामगिरी केली. शहरातील संकेत भोंडवे याने २००७ मध्ये या परिक्षेत यश मिळवले होते. ते सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पीए आहेत. टाटा मोटर्समध्ये मॅनेजर असलेल्या वडिलांचे अकाली निधन व आई गृहिणी अशा स्थितीत तन्मयीने मिळवलेले यश उल्लेखनीय व अनेकांना प्रेरणा देणारे आहे. तिला भाऊ नाही. तिची मोठी बहिण कमर्शिअल आर्टिस्ट आहे. अभ्यासासह सगळ्याच गोष्टींचा बॅलन्स महत्वाचा असल्याचे सांगत तयारी किती तास केली, यापेक्षा टार्गेट काय आहे, हे पाहून तशी तयारी करणे या करिअरसाठी आवश्यक असल्याचे तन्मयीने ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Tanmayi Desai
चौंडीत राडा करणाऱ्या पडळकरांवर गुन्हा दाखल

या परिक्षेला सामोरे जाणाऱ्या तरुण-तरुणींनी करिअरच्या दृष्टीने बॅकअप प्लॅन ठेवला पाहिजे, असे ती म्हणाली. कारण यूपीएससीत व्हेकन्सी कमी व त्यातुलनेत इच्छूक तथा तयारी करणारे प्रचंड संख्येने असतात, हे कारण तिने दिले. म्हणून दुसरा पर्याय असला पाहिजे, असे ती म्हणाली. या परिक्षेसाठी अभ्यास महत्वाचा आहे. पण विचार आणि दृष्टीकोन समतोल तथा बॅलन्स असावा. छंद, कुटुंब, मित्र अशा एकूण सर्वच बाबतीत तो हवा, त्यासाठी दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. पुढे निर्णयप्रक्रियेत ते उपयुक्त ठरते, असा मोलाचा सल्ला तिने दिला.

Tanmayi Desai
नाना पटोलेंच्या दणका; शरद आहेर यांचे काँग्रेस शहराध्यक्ष पद गेले!

सिव्हील सर्व्हिस तथा नागरी सेवेची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तन्मयीने नागरी सेवेच्या या सर्वोच्च परिक्षेत यश मिळवले. देशातील एवढ्या सौर्स तथा संसाधनांचे व्यवस्थापन कोण व कसं करतं याची उत्सुकता तिला लहानपणापासून होती. त्यातून यूपीएससी करायचे तिने ठरवले. प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत ती दहावीपर्यंत शिकली. दहावीला ९५ टक्के गुण मिळवूनही प्रशासनाची आवड असल्याने सायन्सला न जाता या परिक्षेची तयारी व्हावी; म्हणून तिने आर्टस घेतले. पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमधून सायकॉलॉजी या विषयात बीए केलं. यूपीएससीची तयारी तिने २०१८ पासून सुरु केली. तिचा पहिला प्रयत्न २०२० मध्ये फेल गेला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिने यश मिळविलेच, त्यासाठी प्रिलीम, मेन आणि मुलाखत अशा टप्यांची स्वतंत्र तयारी तिने केली. एवढेच नाही, तर प्रीलिमपूर्वी प्रोफेसरची नोकरीही सोडून दिली. ऑनलाईन मेंटॉर इशांत काबरा, कुटुंब, मित्र, मैत्रिणी यांना आपल्या यशाचे श्रेय तिने दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com