Pune Land Scam: पुण्यात आणखी एका सरकारी जमिनीचा घोटाळा! 15 एकर जमीन परस्पर विकली; सहाय्यक दुय्यम निबंधनकाचं निलंबन

Tathawade Land Scam: मुंढवा आणि बोपोडीतील जमीन गैरव्यवहारानंतर ताथवडेतील हा तिसरा घोटाळा उघड झाला आहे.
Pune Land Scam
Pune Land Scam
Published on
Updated on

Tathawade Land Scam: पुण्यातील मुंढवा येथील मूळची महार वतनाची आणि सध्या सरकारच्या ताब्यात असलेली ४० एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता तसंच मुद्रांक शुल्क बुडवून परस्पर विकल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुणे जिल्ह्यातील आणखी एका सरकारी जमिनीचा घोटाळा समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ही जमीनही सरकारला अंधारात ठेवून त्यांची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार घडला आहे. ताथवडे इथली १५ एकर जमिनीची बेकायदा विक्री झाल्याची तक्रार पशुसंवर्धन खात्यानं पुणे विभागीय आयुक्तांकडं केली आहे.

Pune Land Scam
Raju Shinde Join BJP News : दीड वर्ष वेटिंगवर ठेवल्यानंतर राजू शिंदे देवाभाऊच्या साक्षीने करणार भाजपमध्ये घरवापसी!

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवड भागातील ताथवडे येथील राज्य सरकारच्या पशुसंवर्धन खात्याच्या मालकीची १५ एकर जमीन खात्याला अंधारातून ठेवून परस्पर विकली गेली आहे. या व्यवहाराची कागदपत्रे देखील तयार करण्यात आली आहेत. अकरा महिन्यांपूर्वी हा बेकायदा जमीन विक्रीचा प्रकार घडला आहे. विक्री व्यवहाराचा दस्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याला मिळाल्यानंतर खात्यानं विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. तक्रार आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नोंदणी व मुद्रांक विभागाला याबद्दल विचारणा केली, त्यानंतर खरोखरच हा बेकायदा विक्रीचा धक्कादायक व्यवहार समोर आला.

Pune Land Scam
Chhagan Bhujbal : भुजबळांना पुन्हा वगळलं..लोकसभा, विधानसभेनंतर स्थानिकच्या निवडणुकीतही प्रचारापासून दूर ठेवणार

परवानगीशिवाय झाला व्यवहार

ताथवडे येथे पशुसंवर्धन खात्याची ७२ हेक्टर (सुमारे १७८ एकर) जागा आहे. त्यातील एका गटातील पंधरा एकर जागेवर पशुसंवर्धन खात्याचे नाव इतर अधिकारात आहे. त्यामुळं खात्याच्या परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार करता येत नाही. तरीही जानेवारीमध्ये या व्यवहाराला सुरुवात झाल्याचे समोर आलं आहे. संबंधित जागा हेरंब गुपचूप यांच्या खासगी मालकीची असली, तरी इतर अधिकारात पशुसंवर्धन खात्याची नोंद आहे. या जागेसंदर्भात हायकोर्टात मालकानं दावा दाखल केला होता. त्या दाव्याच्या निकालात कोर्टानं मालकीसंदर्भात कोणतेही भाष्य केलेलं नाही. त्यामुळं सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारात पशुसंवर्धन खात्याचं नाव कायम राहिलं. तरीही जानेवारी २०२५ मध्ये गुपचूप यांनी या जागेचा विक्रीचा व्यवहार केला. या व्यवहारापोटी सरकारला कुठलीही माहिती न देता कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला.

Pune Land Scam
Municipal Elections : सामंत, कदमांनी भाजपला जवळ केलं... राष्ट्रवादीला लांब ठेवून शिवसेनेनं दाखल केला नगराध्यक्षपदाचा अर्ज

सहाय्यक दुय्यम निबंधन निलंबित

पुण्यात मुंढव्यातील ४० एकर आणि बोपोडीतील १३ एकर सरकारी जमिनींचा व्यवहार गाजत असतानाच ताथवडेतील हा तिसरा १५ एकर सरकारी जमीन विक्रीचा बेकायदा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com