पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडकविण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे, याचे स्टिंग ऑपरेशन सादर केले. सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांनी हा कट रचल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तर चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कार्यालयातील तेजस मोरे (Tejas More) यांनी हे फसवून स्टिंग केल्याची तक्रारी पुणे पोलिसांकडे केली आहे. याबाबत आज रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
या तक्रारीनंतर प्रसिद्धीमाध्यमांनी मोरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी आपण याबाबत लवकरच येऊन माहिती देणार आहोत. आपण प्रसिद्धीमाध्यमांसमोर येणार असल्याचे सांगत तोपर्यंत व्हाॅटस अप काॅलवरच संपर्कात राहणार असल्याचे सांगितले. तसेच चव्हाण आणि त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सादर करत ते कशा प्रकारे कट रचत होते, हे यात स्पष्ट होत असल्याचा दावा केला.
`सरकारनामा`शी बोलताना त्यांनी चव्हाण यांची कामे आपल्याला पसंत नव्हती. हे आपण त्यांना दोन वेळा सांगितले होते. पण त्यांनी ते ऐकले नाही. त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केल्याची माहिती मला मिळाली आहे. त्याबाबत मी स्वतः माध्यमांसमोर येऊन माझी बाजू मांडेन. आपण पुण्यात 2012 मध्ये आलो. मी बांधकाम व्यवसायात आहे. मला पैशासाठी अशी कृत्ये करण्याची गरज नाही. चव्हाण हे चुकीचे आरोप करत आहेत.
तुमचा भाजपच्या कोणत्या नेत्यांशी संबंध आहे का, या प्रश्नावर त्यांनी अजिबात नाही, असे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना ओळखता का, यावरही त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. या प्रकरणातील कायदेशीर लढाईत कोणाचा सल्ला घेणार, यावर त्यांनी मी ही लढाई माझीच लढणार आहे. मला कोणाच्या मदतीची गरज नसल्याचे सांगितले.
गिरीश महाजन यांच्याशी संबंधित प्रकरणातील भोईटे गट आणि पाटील हे दोन्ही माझे जवळचे नातेवाईक आहेत, असाही दावा त्यांनी केला. माझ्या विरोधात माझ्या व्यावसायिक पार्टनरने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे मी तुुरुंगात होतो. मला जामीन मिळवून देण्यासाठी वकिल म्हणून चव्हाण यांची एंट्री झाली. त्यांची आणि माझी आधी ओळख नव्हती. घरच्या मंडळींनी माझे वकील म्हणून त्यांची निवड केली होती. कारण त्या वेळी मी तुरुंगात होतो, अशी माहिती त्यांनी सांगितली. चव्हाण हे राष्ट्रवादीचे काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. फडणवीस यांना हा पेन ड्राईव्ह पोस्टाद्वारे मिळाल्याची माहिती मिळाली आहे, तुम्हाला त्याबाबत काही कल्पना आहे का, यावर त्यांनी मला त्याची काही माहिती नसल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.