Attack on Nikhil Wagle : मोठी बातमी! वागळे हल्लाप्रकरणी भाजप, राष्ट्रवादीच्या 10 पदाधिकाऱ्यांना अटक

Nikhil Wagle Vs Pune BJP, NCP : विरोध डावलून वागळे कार्यक्रमस्थळी यायला निघाले होते, त्यानंतर...
Nikhil Wagle
Nikhil WagleSarkarnama
Published on
Updated on

Pune News: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी शहरातील काही चौकांमध्ये वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांच्यासह माजी नगरसेवक, यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. प्रभात रस्ता गल्ली क्रमांक 14, नवी पेठ, सेनादत्त पोलिस चौकीजवळ तसेच लोकमान्यनगर, दांडेकर पूल या ठिकाणी हा हल्ला झाला होता. याप्रकरणी पर्वती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत श्रद्धा पवार यांनी तक्रार दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nikhil Wagle
Suhas Diwase : जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचा वाढणार 'ताप'; कुणी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

पत्रकार वागळे यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होते. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी वागळेंचा कार्यक्रम उधळून देण्याचा इशारा दिला होता. हा विरोध डावलून वागळे कार्यक्रमस्थळी यायला निघाल्याने संतप्त भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला.

दांडेकर पूल येथील राष्ट्रसेवा दलाच्या निळू फुले सभागृहात 'निर्भय बनो' ही सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून निखिल वागळे मार्गदर्शन करणार होते. मात्र या कार्यक्रमासाठी वागळे यांना येऊ देणार नाही, असा इशारा भाजपाने(BJP) दिला होता. या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना वागळे यांच्या वाहनावर हल्ले करण्यात आले. या हल्ल्याचे व्हिडिओ शुक्रवारी संध्याकाळपासून सोशल मीडियाद्वारे सर्वत्र व्हायरल झाले होते. समाजातील विविध घटकांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा धिक्कार केला होता.

Nikhil Wagle
Raj Thackeray News : 'पुण्येश्वर' आणि 'नारायणेश्वर' मुद्द्याकडे आता राज ठाकरे लक्ष घालणार?

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप नोंदवण्यात आले होते. राज्यात शिंदे -फडणवीस- पवार यांचे सरकार असल्याने आरोपींवर कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला जात होता. पोलिसांवर विविध प्रकारचा दबाव असल्याची टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर तातडीने पावलं उचलत या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पोटे, सरचिटणीस बापू मानकर, भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी गणेश घोष, गणेश शेरला, स्वप्निल नाईक, प्रतीक देसरडा, दुष्यंत मोहोळ, गिरीश मानकर, राहुल पायगुडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्ता सागरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com